Homeशिक्षणनव कृष्णा व्हॅली ज्युनिअर कॉलेजचा १२ वी चा १००% निकाल...

नव कृष्णा व्हॅली ज्युनिअर कॉलेजचा १२ वी चा १००% निकाल…

सांगली – ज्योती मोरे

नव कृष्णा व्हॅली जुनियर कॉलेज एम.आय.डी.सी. कुपवाड येथील इयत्ता 12 वी सायन्सचा निकाल १००% लागला. त्यामध्ये भंडारे ओंकार विजय ९२.१७% गुण मिळवून पहिला आला. पवार ओंकार सतिश ९०.33% गुण मिळवून दुसरा तर मालपाणी भूषण श्रीराम ८९.६७% गुण मिळवून तिसरा आला. कु. चौगुले श्रावणी रविंद्र ८८.५०% गुणासह चौथी व कु माने साक्षी शरद ८८% गुणासह पाचवी आली. तसेच Distinction डिस्टिंक्शन मध्ये ६४ विद्यार्थी आले आहेत. Grade-I – ग्रेड 1 १०२ व Grade –II ग्रेड 2– १३ विद्यार्थी आले. अशाप्रकारे कॉलेजच्या १००% निकालाची परंपरा अखंडीत चालू आहे.

तसेच गणित या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून भंडारे ओंकार विजय व मोरे मोरे ऋषिकेश यांनी कॉलेजचे नाव उज्वल केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजच्या प्राचार्या व संस्थेच्या संचालिका सौ. संगीता महेश पागनीस सुरज फौंडेशनचे अध्यक्ष श्री प्रवीणशेठ लुंकड, सचिव श्री एन. जी. कामत, कॉलेजचे उपप्राचार्य श्री. चव्हाण पी.टी. यांनी अभिनंदन केले.

तसेच ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिवर्षी नव कृष्णा व्हॅली ज्युनिअर कॉलेजचा 100% ची परंपरा आहे तसेच निसर्गरम्य पंधरा एकराच्या परिसरामध्ये नर्सरी ते बारावी सी बी एस सी व स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम तसेच सेमी इंग्रजी आय आय टी व मेडिकल सेंटर सर्व एकाच छताखाली आहे. शिक्षणाबरोबरच स्पोर्ट्स कॅम्पुटर कोडींग 3 डी सेंटर या सर्व सोई सुविधा उपलब्ध आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments