Homeराज्यनव कृष्णा व्हॅली स्कूल येथे ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न...

नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

सुरज फाऊंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड एमआयडीसी येथे आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम नव कृष्णा व्हॅली गुरुकुल स्कूल व मेडिकल व आय आय टी विभागातील इयत्ता पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आयुष मंत्रालय प्रोटोकॉल प्रमाणे 45 मिनिटात सिरीयल प्रमाणे आहे.

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस… यंदा योग दिन (YOGA FOR CLIMATE ACTION) साजरं करण्याचं पाचवं वर्ष आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची (Yoga) सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा पुढाकार घेतला.

27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली. भारतातर्फे संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. एखादा प्रस्ताव एवढ्या कमी वेळेत म्हणजे 90 दिवसाच्या आत एवढ्या मोठ्या देशांनी स्वीकारण्याची पहिलीच वेळ होती.

शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील बहुतेक लोक योगाचा अवलंब करतात. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी जगातील अनेक देशांतील लोक एकत्र येतात आणि योग दिवस साजरा करतात. देशभरात योग दिन यशस्वी करण्यासाठी विविध तयारी करण्यात आली आहे.

यामध्ये ताडासन वृक्षासन हस्तपादासन वक्रासन त्रिकोणासन वज्रासन मकरासन उत्तानपादासन शशकासन अर्ध उष्ट्रासन उष्ट्रासन अशा अनेक प्रकारचे योगासनातील प्रकार मा श्री योगगुरु व मोटिवेशनल स्पीकर संतोष बैरागी इन्चार्ज नव कृष्णा व्हॅली गुरुकुल यांनी स्वतः प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतले यावेळी संस्थेचे सचिव मा एन जी कामत नव कृष्णा व्हॅली स्कूल च्या प्राचार्या व संचालिका सौ संगीता पागनीस नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम चे प्राचार्य मा श्री अधिकराव पवार तसेच उपप्राचार्य प्रशांत चव्हाण, आयटी इन्चार्ज राजेंद्र पाचोरे व स्पोर्टस विभाग प्रमुख विनायक जोशी उपस्थित होते.अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments