Homeराज्यकोगनोळी येथे उद्या दिनांक तीन रोजी आजी-माजी सैनिकांची होणार बाईक रॅली...

कोगनोळी येथे उद्या दिनांक तीन रोजी आजी-माजी सैनिकांची होणार बाईक रॅली…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील तानाजी विष्णू खोत हे 2005 मध्ये देशसेवेत रुजू झाल्यानंतर यांनी प्रदीर्घ 17 वर्षे देशसेवा केली असून नायक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छा वर्षा होत असून उद्या दिनांक 3 ऑगस्ट रोजी ते कोगनोळी येथे आपल्या मूळ गावी देशसेवेतून सेवानिवृत्त होऊन येत असल्याने कोगनोळी येथील आजी-माजी सैनिक फौंडेशनच्या वतीने येतील हेस्कॉम कार्यालय ते गावातील अंबाबाई मंदिरापर्यंत बाईक रॅली काढून तानाजी खोत यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर अंबाबाई मंदिरा जवळ सेवानिवृत्त सैनिक यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. तरी या कार्यक्रमाला कोगनोळी व परिसरातील नागरिकांनी व देश सेवेसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांनी हजर राहण्याचे अहवान करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments