HomeMarathi News Todayगुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार...महिलेसह चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल...

गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर अत्याचार…महिलेसह चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी तब्बल पाच वर्षे शोषण

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

गोकुळ शिरगाव येथील हॉटेलमध्ये जेवणाच्या पार्टी करता बोलवून एका विवाहितेला गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढले व ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच वर्षांपासून तीन संशयतांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेने तब्बल पाच वर्ष अत्याचार सहन केला. त्याचबरोबर आरोपींनी पीडीतेला व्याजाने पैसे देऊन व्याजाचे पैसे न दिल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी एका महिलेसह चौघा जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की २४ ऑगस्ट २०१७ दुपारी तीन वाजता अनिल तानाजी पाटील व रामचंद्र निगडे दोघे (रा. गोकुळ शिरगाव),सुनील दीपक पाटील ( लकी बाजार मागे, राजारामपुरी, कोल्हापूर) व एक महिला यांनी पिडितेला पार्टीसाठी गोकुळ शिरगाव येथील हॉटेलमध्ये बोलावले व कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढले व ते वायरल करण्याची धमकी देऊन गोकुळ शिरगाव परिसरातील हॉटेल, फिर्यादी यांचे राहते घर, ए विंग स्वीट होम अपार्टमेंट, वृंदावन अपार्टमेंट समोर साने गुरुजी वसाहत अशा वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार तीन संशयित पुरुष आरोपींनी ४ ऑगस्ट २०२२ प्रदीर्घकाळ जबरदस्ती बलात्कार केला.

त्याचबरोबर पीडीतेला आर्थिक अडचणीच्या वेळी व्याजाने पैसे देऊन परतफेड करण्याची ऐपत नसतानाही अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आर्थिक शोषण केले. महिलेला फोटो व्हायरल करण्याचे धमकी दिल्यामुळे व स्वतःचे नांदणे जाईल या भीतीने अनेक वर्षापासून अत्याचार सहन केला. मात्र आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये चौघा आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. असून पुढील तपास करता सदरची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडे अधिक तपास साठी पाठवली असून अधिक तपास गोकुळ शेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments