Homeगुन्हेगारीतलावात विद्युत प्रवाह उतरल्याने करंट लागुन एका गाईचा मृत्यु...

तलावात विद्युत प्रवाह उतरल्याने करंट लागुन एका गाईचा मृत्यु…

  • गुगुलडोह मार्गावरील तलावातील घटना
  • सुदैवाने दोन गायी बचावल्या

रामटेक – राजु कापसे

तालुक्यातील तथा रामटेक – तुमसर मार्गावर असलेल्या महादुला येथील रहीवाशी बंडु दशरथ तांडेकर यांची गाय आज दि. १३ ऑगस्ट ला गुगुलडोह मार्गावर असलेल्या तलावाकडे चरण्यासाठी गेली होती. दरम्यान आज सकाळी ८.३० वाजता दरम्यान या परीसरात असलेल्या तलावाला लागुनच असलेल्या विद्युत डि.पी. तील विद्युत प्रवाह तलावाच्या पाण्यात उतरलेला होता.

मात्र यापासुन अनभिज्ञ असलेल्या ३ गायी तलावाच्या पाण्यात शिरल्या. तोच त्या तिन्ही गायींना करंट लागला. मात्र यावेळी बंडु तांडेकर यांच्या गाईला जोरदार करंट लागल्याने तिचा मृत्यु झाला तर इतर दोन गायींना सौम्य करंट लागल्याने त्या सुदैवाने बचावल्या. यावेळी तांडेकर यांचे सांगण्यानुसार त्यांचे जवळपास ३० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. रामटेक पोलिसांनी पंचनामा केलेला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत पांडे यांचेसह पोलीस हवालदार रविंद्र मारबते हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments