कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता.निपाणी येथील कै.बाळासो- सुमती फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.त्याचप्रमाणे येथील गरजु होतकरू विद्यार्थी आकाश जाधव याला शैक्षणिक मदतीसाठी कै.बाळासो-सुमती फौंडेशनच्या वतीने सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील(पिडाप) आणि ग्रा.पं.सदस्य राजगोंडा पाटील(टोपान) यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक पत्रकार अनिल पाटील यांनी केले.कुमार पाटील बोलताना म्हणाले कै.बाळासो-सुमती फौंडेशनच्या वतीने अनेक गरजु होतकरू विद्यार्थ्यांना आजपर्यंत मदतीचा हात दिला असुन बबन पाटील यांनी समाजाभिमुख काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याआधीही लोकांना उपयोगी असे वाचनालय देखील काढण्यात आले आहे असे मनोगत केले. याप्रसंगी धिरज पाटील,अविनाश पाटील,सतिश जाधव,बाबुराव वरुटे,अनिल पाटील,विजय चौगुले,राजु चौगुले,आण्णासाहेब वरुटे,ऋषिकेश पाटील,बाबुराव पाटील,आण्णासाहेब पाटील,अजित पाटील,अशोक वंदुरे आदी उपस्थित होते..