Homeखेळमत्तिवडे येथे रयत संघटनेच्या वतीने घोडा बैल शर्यत संपन्न...

मत्तिवडे येथे रयत संघटनेच्या वतीने घोडा बैल शर्यत संपन्न…

कोगनोळी ; प्रतिनिधी…

मत्तिवडे ता.निपाणी येथे श्रावण मासा निमित्त कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने भव्य घोडा बैल शर्यती संपन्न झाल्या.या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजु पोवार यांची होती.प्रारंभी राजु पोवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन या शर्यतीचे उदघाटन करण्यात आले.

ते बोलताना म्हणाले सध्या मोबाईल,व्हाँटस अँप,फेसबुक मुळे मैदानी खेळाकडे तरुणांनी दुर्लक्ष केले असुन त्यांच्यामध्ये मैदानी खेळाकडे पुन्हा एकदा महत्त्व पटवून देण्यासाठी सदर कार्यक्रम राबविण्यात आला आहे.असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक मत्तिवडे रयत संघटना शाखेचे अध्यक्ष शरद भोसले यांनी केले.या शर्यतीमध्ये अक्षय पाटील( मत्तिवडे) यांचा प्रथम क्रमांक, निवास पाटील (हदनाळ) याचा द्वितीय क्रमांक आणि शुभम केसरकर यांचा तृतीय क्रमांक असे अनुक्रमे क्रमांक आले आहेत.

यावेळी पंचक्रोशीतील शर्यत शौकीन यांची मोठी गर्दी पहायला मिळाली.याप्रसंगी मत्तिवडे शाखा उपाध्यक्ष चिनू कुळवमोडे, उदय जाधव ,शुभम केसरकर ,सचिन भोईटे, संजय काटे ,राहुल खाडे, सुनील यादव ,अक्षय पाटील यांच्यासह संघटनेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments