Homeगुन्हेगारीधावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार...पुलगावातील धक्कादायक प्रकार...आरोपी अटकेत

धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार…पुलगावातील धक्कादायक प्रकार…आरोपी अटकेत

वर्धा जिल्ह्यात पुलगाव शिवारात धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुलगाव- शाळेत जाताना 13 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवत अपहरण केले. कार मध्ये बसवून धावत्या कार मध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत निघाली असता तिला कार मध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्येच नराधमांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहेय. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.

पुलगाव येथील, 13 वर्षीय पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये खेचलं.

पीडितेचे अपहरण करताच, नराधमांनी सुसाट वेगाने कार पळवली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. दरम्यान, धावत्या कारमध्येच आरोपी सुमेध याने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments