Thursday, April 25, 2024
Homeगुन्हेगारीस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून एका मोटरसायकल चोरास विश्रामबाग धामणी चौकात अटक -...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून एका मोटरसायकल चोरास विश्रामबाग धामणी चौकात अटक – एक गुन्हा उघड…

Share

सांगली – ज्योती मोरे

पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विश्रामबाग मधील धामणी चौकातून खास बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार मनीषकुमार श्रीकिशनप्रसाद गौड वय 21 वर्षे राहणार सातपुते बिल्डिंग आर के नगर इचलकरंजी, मूळ राहणार सिमरा हारडो, तालुका कुबेरास्थान, जिल्हा कुशीनगर, उत्तर प्रदेश यास ताब्यात घेतले.

त्याच्या जवळून विक्रीसाठी आणलेली चोरीची विना नंबर प्लेटची चाळीस हजार रुपये किमतीची सुझुकी एक्सेस गाडी जप्त करण्यात आली सदर गाडी विषयी चौकशी केली असता, गेल्या आठ दिवसापूर्वी सांगली गोकुळ नगर पार्किंग मधून लॉक तोडून चोरी केल्याचे सांगितले. मुद्देमालासह आरोपीस विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून,पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,अनिल कोळेकर, विक्रम खोत,संदीप गुरव,बिरोबा नरळे ,जितेंद्र जाधव,निलेश कदम, संदीप पाटील,सागर लवटे, सागर टिंगरे आदींनी केली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: