Homeसामाजिकसाजगाव यात्रेतील एका मिठाईच्या दुकानात नाग जातीचा साप अमोल ठकेकर यांनी रेस्क्यू...

साजगाव यात्रेतील एका मिठाईच्या दुकानात नाग जातीचा साप अमोल ठकेकर यांनी रेस्क्यू केला…

कोकण – किरण बाथम

खालापूर तालुक्यात कोरोना महामारीच्या गॅप नंतर यंदा बोंबल्या विठोबा यात्रेचे मोठ्या जल्लोषात आयोजन केले गेले आहे. यात्रा तात्पुरत्या काळा करता वन खात्याच्या जमिनीवर झाडी गवत साफ करून आयोजित केली जाते. याच ठिकाणी शैलेश आंबवणे यांचे पारंपरिक प्रसिद्ध असे मिठाईचे दुकान आहे.

त्यांच्या दुकानातील आतल्या भागात दगड गोट्याची भर घालून बनवलेल्या जमिनीवर कामगाराला साप दिसला. त्यांनी लागलीच ही बाब शैलेश आंबावणे यांच्या लक्षात आणून दिल्या नंतर सर्पमित्र अमोल ठकेकर यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. अमोल ठकेकर यांना त्या ठिकाणी नाग जातीचा साप दिसून आला. विशाल चव्हाण यांच्या मदतीने अमोल ठकेकर यांनी त्या सापाला सुरक्षित ताब्यात घेतले.

यात्रेच्या आयोजनापूर्वीच त्या ठिकाणी दगड गोट्याखाली रहिवासात असलेला तो नाग जातीचा विषारी साप भक्ष शोधण्यासाठी बाहेर आल्याने त्याला पकडण्यात यश आल्याचे अमोल यांनी सांगितले. कोणताही साप भूक लागल्याशिवाय भक्ष शोधण्यास बाहेर पडत नाही, त्या कारणे इतके दिवस तो कोणालाही दिसून आला नसावा.

एकीकडे यात्रेत भाविकांची तुडुंब गर्दी आणि दुसरीकडे दुकानातील अडगळीची जागा असताना अत्यंत काळजीपूर्वक अमोल ठकेकर यांनी नागाला पकडले. तो नाग जातीचा साप पूर्ण वाढ झालेला साधारणतः पाच फूट लांबीचा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments