HomeFeaturedराज्यझिंजेरिया गावाजवळील ऐन शेतशिवारात वाघाने केली रानडुकराची शिकार - ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण...

झिंजेरिया गावाजवळील ऐन शेतशिवारात वाघाने केली रानडुकराची शिकार – ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण…

आर एफ ओ शिंदेनी दिला सतर्कतेचा इशारा…

राजु कापसे

रामटेक तालुक्यातील तथा पवनी बफर झोन मध्ये येणाऱ्या झिंजेरीया गाववस्तीपासुन अवघ्या १ कि.मी. अंतरावर असलेल्या शेतशिवारात आज दि. २७ जुलैला सकाळच्या सुमारास वाघाने एका रानडुकराची शिकार केल्याची घटना घडली.

विशेष म्हणजे वाघाने ही शिकार शेतकरी कुंजीलाल सिरसाम यांच्या ऐन शेताच्या धुऱ्याजवळ केली. सध्या सर्वीकडे शेतीची कामे सुरू असल्याने येथे काम करीत असलेल्या ग्रामस्थांमध्ये यावेळी एकच खळबळ उडाली. त्यामुळे ग्रामस्थांनी आरडाओरड करताच वाघ शिकारीचा अर्धा भाग खाऊन व अर्धा भाग तेथेच ठेवुन लागुनच असलेल्या जंगलात पळुन गेला. माहिती कळताच येथे काही माणवहाणी घडु नये या उद्देशाने वनपरीक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी येथे दोन वनकर्मचारी येथे तैनात केले.

वाघाने अर्धीच शिकार खाल्ली असल्याने वाघ येथे पुन्हा सायंकाळच्या सुमारास आला होता असे वनपरीक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी सांगीतले. या नंतर रानडुकराचा अर्धा भाग वनविभागाकडुन दफन करण्यात आला. ऐन शेतशिवारात झालेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आर.एफ.ओ. शिंदेंनी दिला सतर्कतेचा इशारा
वाघाने आपली शिकार अर्धिच खाऊन उर्वरीत शिकार तेथेच सोडल्याने वाघ तेथे पुन्हा येऊ शकतो असा तर्क लाऊन आरएफओ शिंदे यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून झिंजेरीया गावात वनविभागाचे वाहन पाठवुन दवंडी दिली व त्या द्वारे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments