HomeSocial Trendingमोबाईल टॉवरवर चढून केलं अनोखं आंदोलन...तलाठयावर कारवाई करा...

मोबाईल टॉवरवर चढून केलं अनोखं आंदोलन…तलाठयावर कारवाई करा…

अमोल साबळे
अकाेला: तालुक्यातील सांगळुद येथील एका शेतकऱ्याच्या शेतीचा फेरफार चुकीच्या पद्धतीने घेऊन मानसिक त्रास दिला असा आराेप करत या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रहारचे अकाेला महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं.

अकोला तालुक्यातील सांगळुद येथील बबन डोंगरे यांच्या मालकीचे शेत असून त्यांच्या शेतीची खरेदी काही दिवसांपूर्वी झाली. दरम्यान, ही खरेदी रद्द करण्यात यावी, यासाठी डोंगरे यांनी न्यायालय आणि उपविभागीय कार्यालयात धाव घेतली. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाही महादेव सरप या मंडळ अधिकाऱ्याने व तलाठी जायले यांनी चुकीच्या पद्धतीने फेरफार घेतल्यामुळे डोंगरे या शेतकऱ्याला मानसिक त्रास झाला आहे.

त्यामुळे या दोघांवरही तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करत प गिरी यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments