Saturday, April 20, 2024
Homeगुन्हेगारीतासगाव मधील अल्पवयीन बालकाचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणास अटक...

तासगाव मधील अल्पवयीन बालकाचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणास अटक…

Share

सांगली – ज्योती मोरे

तासगाव विभागात चोरी, घरफोडी, जबरी चोरी मधील हवे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सागर टिंगरे यांना गोपनीय खबर्यामार्फत बाल लैंगिक शोषणाच्या आरोपा खालील अमोल उर्फ प्रदीप गुंडा पाटील वय 26 वर्षे राहणार कुमठे तालुका तासगाव हा कुमटे फाट्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास जागीच ताब्यात घेतले.

त्याच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद असल्याने त्याच तासगाव पोलीस ठाण्याकडे रिपोर्ट वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहे. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस अंमलदार अच्युत सूर्यवंशी, संदीप गुरव, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, मच्छिंद्र बर्डे ,सोहेल कार्तियानी आणि आदींनी पार पाडली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: