Homeराज्यआम आदमी पक्षाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची झाडाझडती...

आम आदमी पक्षाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची झाडाझडती…

सांगली – ज्योती मोरे

आज दिनांक 16/06/2022 रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला व रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत निवेदन देऊन त्याच्यावर त्वरित उपायोजना करण्यात यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.

यावेळी असे आढळून आले कि या कार्यालयांमध्ये शासनाच्या कोणत्याही नियमाची अंमलबजावणी केली जात नाही. कार्यालयांमध्ये कर्मचारी वेळेत उपस्थित नसतात. कर्मचाऱ्यांचा गणवेश नसतो. त्यांचे आयडेंटी कार्ड नसते व महत्वाचे म्हणजे सकाळी साडेदहा वाजता कार्यालय बंद आढळून आले. कार्यालयाची वेळ हि सकाळी 9:45 ची असून देखील दहा वाजून तीस मिनिटा पर्यंत कार्यालयाला चक्क कुलूप होते. तसेच कार्यालयांमधून पेपर गायब होण्याचे चुकीचे प्रकार घडत आहेत.

त्याचबरोबर कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर मेंटेन केले जात नाही कि तक्रार रजिस्टर ठेवले जात नाही. शासनाचे कोणतेही नियम अद्याप कार्यालयांमध्ये चालू स्थितीत आढळून आलेले नाहीत.एका सर्वसामान्य रिक्षाचालकाचा अपघात झाला असून केवळ कार्यालयाच्या चुकीमुळे त्याच्या परमिटवर महानगरपालिका एरिया अशी नोंद झाली असल्या कारणाने त्यांना आता इन्शुरन्स क्लेम मिळत नाही.

संबंधित रिक्षाचालक हा खूप हलाखीच्या परिस्थितीत असून त्यांचा एक डोळा देखील त्या अपघातात त्यांनी गमावला आहे. आज त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची बनली आहे. या कार्यालयाच्या चुकीमुळे सर्वसामान्य रिक्षाचालकांचे हाल होत आहेत व या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देऊन देखील अद्याप कोणतीही कारवाई कार्यालयाकडून झालेली नाही तरी संबंधित रिक्षाचालकाला न्याय नाही मिळाला तर आम आदमी पार्टीच्या वतीने कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सदर आंदोलनाचे नेतृत्व वसीम मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र सचिव यांनी केले. यावेळी मिरज तालुका अध्यक्ष श्री. आरिफ मुल्ला, उपाध्यक्ष श्री. फय्याज सय्यद, सचिव श्री विनोद मोरे, मिरज शहर अध्यक्ष श्री. जोहेब मुल्ला, उपाध्यक्ष श्री. रवी बनसोडे, सचिव श्री. श्रीकांत चंदनवाले, मिरज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. संभाजी मोरे,

उपाध्यक्ष श्री. इम्रान पठाण, शिवाजी गायकवाड, सांगली जिल्हा युथ विंगचे सचिव श्री. निसार मुल्ला, उपाध्यक्ष श्री. तौफिक हवालदार विपुल थोरात असिफ सारव्हान संतोष मुळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments