‘बाळासाहेबांची शिवसेना आज राहिली नाही,’ म्हणून बंडखोर आमदारांनी चक्क बाळासाहेबांच्या रक्ताशी गद्दारी करून बंड पुकारले आणि शिवसेनेची जुनी घोषणा ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ हा नारा दिला, यात काही अपक्ष आमदारांचा खरा चेहरा बघायला मिळाला तर सोशल मीडियावर चर्चा होतंय ती सिल्लोड चे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची, यांनाही बाळासाहेबाचं हिंदुत्व हवंय? म्हणूनच त्यांनी बंड केल्याचे दिसत आहे? का आणखी दुसरं कारण आहे? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
अब्दुल सत्तारांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि आल्या आल्याच मंत्रिपद मिळालं ते ही आता नको असेल म्हणूनच भाजपा ला साथ देण्यासाठी एकनाथ शिंदेच्या सुरात सूर मिळवत आहे. ज्या मतदारांच्या भरवशावर निवडून येतात कदाचित त्यांचा तरी ते विचार करतील का?अवघं देश तुमचं नाटकं बघताहेत.
अकोला बाळापूर चे आमदार नितीन देशमुख यांचे सोबत जे घडलं ते इतर आमदारांसोबत घडलं असेल? मात्र तोंड उघडायची हिम्मत कोणातच नसेल कारण आणि जो पर्यंत आपल्या स्वगृही परत येत नाही तो पर्यंत कोणीही तोंड उघडणार नाहीत यात अब्दुल सत्तार यांचंही कदाचित असंच झालं असेल असा तर्क वितर्क सोशल मीडियावर सुरू आहे.
बाळासाहेब यांचं हिंदुत्व सोडलं हा आरोप फेटाळताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर २०१४ मध्ये स्वबळावर लढलो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ६३ आमदार निवडून आणले. त्यानंतर बाळासाहेबांच्या काळातील अनेक शिवसैनिकांना याच शिवसेनेमुळे पदे मिळाली,’ याची आठवण त्यांनी करून दिली. हिंदुत्वाला तिलांजली देत सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, असा आरोप भाजप व शिंदे करतात. तो खोडून काढताना उद्धव म्हणाले, ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. आदित्य हे एकनाथ शिंदे व इतर नेत्यांसह अयोध्येला जाऊन आले, ते हिंदुत्वासाठीच’ अशी आठवण त्यांनी करून दिली.