Homeगुन्हेगारीनरसी मुखेड रस्त्यावर कोपरा पाटी जवळ अपघात…एक ठार एक गंभीर जखमी...

नरसी मुखेड रस्त्यावर कोपरा पाटी जवळ अपघात…एक ठार एक गंभीर जखमी…

महेंद्र गायकवाड, नांदेड

नरसी मुखेड रस्त्यावर जीप व मोटार सायकलच्या समोरा समोर झालेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली.जखमी ला तात्काळ उपचारार्थ नायगाव येथे दाखल आले तर रात्री उशिरा पर्यंत मयताच्या पार्थिवावर शवविच्छेदन झाले नव्हते.

नायगाव तालुक्यातील मुखेड नरसी मार्गावर असलेल्या गडगा जवळील कोपरा फाट्यावर टाटा सुमो जीप व मोटर सायकलचा समोरा समोर आपघात झाला. मोटार सायकल क्रमांक एम २६ सी. बी. ६५५४ आणि टाटा सुमो जीप क्रमांक एम एच २९ ए डी. ४१८० या वाहणाच्या समोरा समोरजबर धडक झाली.या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.

सदर घटना नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याची माहिती नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली. सदरील अपघातातील ठार झालेल्या व्यक्तीचे नाव दीपक जगजेराव पवार वय १९वर्ष रा.औराळा ता.नायगाव असे असून गंभीर जखमीचे नाव संतोष आनंदा पवार वय ३० वर्ष रा.ओराळा ता.नायगाव असे आहे. जखमी व मयत यांच्या जवळ कोणती ही ओळख पटणारे कागद पत्र किंवा काहीच न सापडल्याने दोघांची नावे बराच वेळ मिळून आले नसल्याचे पोनि शिंदे यांनी सांगितले.

सदर गंभीर जखमी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नायगाव तालुक्यातील गडगा व कोपरा दरम्यान असलेल्या फाट्यावर मोटार सायकल क्रमांक एम २६ सी. बी. ६५५४ आणि टाटा सुमो जीप क्रमांक एम एच २९ ए डी. ४१८० या वाहणाच्या समोरा समोरील अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.

सदरची घटना घडताच नायगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी घटनेची पाहणी केली व पंचनामा केला तरी पण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत चालू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments