रामटेक – राजु कापसे
रामटेकवरून दक्षिणेकडे १० किमी अंतरावर असलेल्या नगरधन येथे दिनांक २०जून २०२२ चे दुपारी १२.५० ते १२.१५ या दरम्यान फिर्यादी शशिकांत विठोबा गायधने,वय ५२ वर्ष रा. नगरधन यांनी त्यांचा कल्टीवेटर आपल्या बहिनीचे घरी ठेवला होता. यातील अनोळखी आरोपीने फिर्यादीचे भाचीस विश्वासात घेवुन लबाडीने सदर कल्टीवेटर घेवून गेल्याने पो.स्टे. रामटेक येथे अप क्र. ३५०/२२ कलम ४०६ भादवि चा गुन्हा नोंद करून तपासात होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना दि २२.जून २०२२ रोजी मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून चाचेर येथे राहणारा आरोपी संदीप शंकर वाघमारे, वय ३० वर्ष, रा. चाचेर यास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचा लाल रंगाचा सोनालिका कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर वापरून लबाडीने फिर्यादीचा कल्टीवेटर घेवून गेल्याचे सांगितल्याने त्याचा लाल ट्रॅक्टर किंमत २,३०,०००/-रू व कल्टीवेटर किंमत २०,०००/-रु. असा एकुण २,५०,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाही करीता पोस्टे रामटेकच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक, विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्षक, राहुल माकणीकर यांचे आदेशाने स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,ओमप्रकाश कोकाटे आणि पाोलिस निरीक्षक,प्रमोद मुकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सफौ / चंद्रशेखर गडेकर पोना अमोल बाग, रोहन डाखोरे, चालक अमोल कुथे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांचे पथकाने केली आहे.