Homeगुन्हेगारीसांगलीतील शंभर फुटी रोडवर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीस अटक...

सांगलीतील शंभर फुटी रोडवर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीस अटक…

सांगली प्रतिनिधी :–ज्योती मोरे.

सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या अनिकेत श्रीकांत नाटेकर, वय 21 वर्षे, राहणार पहिली गल्ली सावंत प्लॉट इंदिरानगर सांगली या तरुणास विश्रामबाग पोलिसांनी आज अटक केली आहे.

त्याच्याकडून नक्षीदार खडे असलेल्या लाकडी कव्हर मध्ये असलेली लोखंडी पात्याची 26 इंच लांबीची तलवार आणि सुमारे वीस हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शंभर फुटी रोडवरील हॉटेल डायमंड जवळ एक इसम हातामध्ये धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने, सदर ठिकाणी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार व पेट्रोलिंग करिता असणारे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रांत घेरडे ,पोलीस नाईक रंजीत घारगे ,पोलीस नाईक इमरान नदाफ व पोलीस कॉन्स्टेबल महंमद मुलानी यांनी तात्काळ धाव घेतली व या आरोपीस ताब्यात घेतले.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक महंतेश मगदूम हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments