Homeगुन्हेगारीलोखंडी फंट्याने डोक्यावर मारहाण करून डोकं फोडल्या प्रकरणातील गुन्ह्यामधील आरोपीची निर्दोष मुक्तता...

लोखंडी फंट्याने डोक्यावर मारहाण करून डोकं फोडल्या प्रकरणातील गुन्ह्यामधील आरोपीची निर्दोष मुक्तता…

मुर्तीजापुर – नरेंद्र खवले

घटनेची हकीकत अशाप्रकारे आहे की दिनांक ०९/०३/२०१६ रोजी ओम जिनिंग फॅक्टरीमध्ये स्टेशन विभागातील आरोपी नामे जितेश होटे हा काम करीत होता त्याच्यासोबतच मनोज नावाचा इसम सुद्धा काम करीत होता. घटना ही दुपारी चार वाजता चे दरम्यानची आहे. फिर्यादी मनोज याला आरोपी जितेश होटे याने घटनेच्या दिवशी शिवीगाळ केली व मनोजला धक्काबुक्की करून लोखंडी फंट्याने डोक्यावर मारले. ज्यामुळे मनोजचे डोके फुटून रक्त निघू लागले व त्याला जखम झाली.

त्याचबरोबर आरोपी जितेशने मनोजला तोंडावर मारल्यामुळे त्याचे खालचे ओठ सुद्धा फाटले होते. आरोपी जितेश फिर्यादीस मारहाण करीत असताना उपस्थित इतर लोकांनी आरोपी जितेश होटे पासून मनोजला वाचविले व दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर मनोज ने जितेश होटे विरुद्ध मुर्तीजापुर पोलीस स्टेशन येथे जितेश होटे यांनी लोखंडी फंट्याने मारहाण केली असा रिपोर्ट दिला.

सदर रिपोर्टवरून व डॉक्टरांच्या मेडिकल सर्टिफिकेट वरून आरोपी जितेश होटे याचे विरुद्ध भारतीय दंड विधान चे कलम 324, 504 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. वरील गुन्ह्यांमधील खटला हा मुर्तीजापुर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सदर खटल्यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे एकंदरीत नऊ साक्षीदार तपासण्यात आले सदर साक्षीदारांचा उलट तपास आरोपीचे वकील सचिन वानखडे यांच्यामार्फत घेण्यात आला.

सदर प्रकरणामध्ये युक्तिवाद करीत असताना सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की आरोपी जितेश होटे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून जितेश याने लोखंडी फंट्याने मारल्यामुळे फिर्यादी मनोजचे डोके फुटून रक्त निघाले व त्याचे ओठ सुद्धा मारहाणी मध्ये फाटले करिता आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने व त्याचे कृत्य हे बेकायदेशीर असल्याने त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती सरकारी पक्षाने न्यायालयास केली.

आरोपीच्या वतीने ॲड. सचिन वानखडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की सदर गुन्ह्यामध्ये आरोपीस खोटे फसवण्यात आले असून फिर्यादी मनोज याला आरोपी जितेश होटे याने मारले नसून मनोज चा पाय घसरून तो खाली पडला व पडल्यामुळे मनोज ला जखम होऊन रक्त निघाले. त्याचप्रमाणे आरोपींचे वकिलांनी न्यायालयात युक्तिवादामध्ये असेही म्हटले की पूर्व वैमानस्यातून फिर्यादीने आरोपीचा वचपा काढण्याकरिता त्याला खोट्या प्रकरणामध्ये अडकविले.

त्याचप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयावर देखील आरोपीचे वकिलांनी आरोपीच्या बचावा करिता भिस्त ठेवली. त्याचप्रमाणे आरोपीच्या बचावा करिता काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील आरोपीचे वकिलांनी माननिय न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी जितेश होटे याची निर्दोष मुक्तता केली. आरोपी जितेश होटे यांचे वतीने न्यायालयामध्ये ॲड. सचिन वानखडे यांनी युक्तिवाद केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments