Homeमनोरंजनलग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार….मुंबईतील बिल्डरला अटक..

लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार….मुंबईतील बिल्डरला अटक..

मुंबई – लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका बिल्डरला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य अजय कपूरने 24 वर्षीय अभिनेत्रीला उपनगरातील वांद्रे येथील मित्राच्या घरी भेटले होते. पीडित अभिनेत्रीने काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आदित्य अजय कपूरने लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते. कपूरने कफ परेड भागात आणि गोव्यातील राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने एफआयआरच्या हवाल्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा अभिनेत्रीने लग्नासाठी विचारणा केली तेव्हा आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. एवढेच नाही तर अभिनेत्रीने नकार दिल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पीडितेच्या आई-वडिलांच्या फोन नंबरवर अश्लील मेसेज पाठवले आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

सध्या कपूरला बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिस संबंधित पक्षांशी चर्चा करत असून दोघांच्या ओळखीच्या काही जणांचे जबाबही नोंदवत असल्याचेही सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments