Homeराज्यसांगलीतील अखंड शिवज्योत प्रेरणा देत राहील - पृथ्वीराज चव्हाण...

सांगलीतील अखंड शिवज्योत प्रेरणा देत राहील – पृथ्वीराज चव्हाण…

सांगली – ज्योती मोरे

पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने सांगलीत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत ठेवलेल्या शिवज्योतीमुळे लोकांना नेहमीच प्रेरणा मिळत राहील अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

श्री. चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चिरंतन ज्योत तेवत ठेवण्याचा हा देशातील पहिला उपक्रम असावा. यामुळे छत्रपतींचा इतिहास लोकांच्या डोळ्यासमोर राहणार आहे. पृथ्वीराज पाटील यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. श्री. चव्हाण यांनी आज शिवज्योतीच्या ठिकाणी भेट दिली.

यावेळी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, ज्यांच्या संकल्पनेतून ही शिवज्योत साकारली ते विरेंद्रसिंह पाटील, नगरसेवक तौफिक शिकलगार, मयुर पाटील, डॉ. संजय पाटील, राहूल पाटील, पंडीत पाटील, कदम साहेब, अजय देशमुख, रवी खराडे, संतोष भोसले, सनी धोतरे, आशिष चौधरी, मौला वंटमोरे, आयुब निशाणदार, श्रीनाथ देवकर, अमित बसतवडे, महावीर पाटील, ऋषिकेश जाधव, जयदीप थोरात, चेतन दडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments