Homeराज्यदरोड्याच्या खोट्या तक्रारीचा अकोला LCB ने केला पर्दाफाश...फिर्यादीनेच केला पैशांसाठी दरोड्याचा बनाव...दिड...

दरोड्याच्या खोट्या तक्रारीचा अकोला LCB ने केला पर्दाफाश…फिर्यादीनेच केला पैशांसाठी दरोड्याचा बनाव…दिड लाखाचा मुद्देमाल जप्त…

संजय आठवले – आकोट

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाणे हद्दीतील कोळंबी येथिल राज्य महामार्गावर दि. १५ जून रोजी घडलेली दरोड्याची घटना व त्या संदर्भात दिलेली तक्रार ही खोटी असल्याचे व या संदर्भात फिर्द देणारास पैशांची आवश्यकता असल्याने त्यानेच हा दरोड्याचा बनाव केल्याचे अकोला LCBने ऊघडकिस आणले आहे. पोलिसानी फिर्यादीकडून दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार दि.१५/०६/२०२२ रोजी तक्रारदार नामे सागर सुरेश काळे वय ३० वर्षे रा. बाळापुर नाका अकोला व रोहीत हर्षल सांगळे वय २२ वर्षे रा. शिवसेना वसाहत अकोला यांना पोलिस स्टेशन बोरगाव मंजु येथे येवुन तकार दिली कि, ते दोघे अकोला येथे सहारा टेडर्स येथे गोपाल नमकिन चा माल अकोला जिल्हयातील ग्रामीण भागात मालवाहक वाहनातुन नेतात. आणि विक्री करून रोख रक्कम मालक सगीर अंसारी यांचे कडे जमा करतात.

नेहमी प्रमाणे दि. १५/०६/२०२२ रोजी पातुर नंदापुर येथुन गोपाल नमकिनचा माल विकुन रात्री ०९ / ३० वा.चे सुमारास कोळंकी कडे येत असताना एक मोटार सायकलवरील तीन इसमांनी मालवाहक गाडीच्या काचांवर दगड मारून गाडी अडवली. आणि चाकुचा धाक दाखवुन तसेच फिर्यादीचे डोक्यावर मारहाण करून सोबत असलेली पैसाची बॅग, ज्यामध्ये दिवसभर जमा केलेले अंदाजे ४५५००/-रू व दोन मोबाईल असे हिसकावुन घेवुन गेले.

अशा तक्रारीवरून पोलिस स्टेशन बोरगाव मंजु येथे अप.क्र.२११/२२ कलम ३९४, ३४ भा. द. वि. गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानीक गुन्हे शाखा पथकाला दिले.

पथकाने सदर गुन्हयातील घटनास्थळाला भेट देवुन तसेच यातील तक्रारदार यांना कसुन विचारपुस केली असता तक्रारदार सागर सुरेश काळे वय ३० वर्षे रा. बाळापुर नाका अकोला व रोहीत हर्षल सांगळे वय २२ वर्षे रा. शिवसेना वसाहत अकोला यांनी सांगितले की, त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी लुटमार झाल्याचा बनाव रचला. आणि त्यांचे कडे असलेली रोख रक्कम व त्यांचे मोबाईल निखीलेश विजय भोजने वय २१ वर्षे धंदा शिक्षण रा. तथागत नगर,

बाळापुर रोड अकोला याचे कडे दिली नंतर पोलिस स्टेशनला येवुन खोटी तक्रार दाखल केल्याचे सांगितले. त्यावरून निखीलेश विजय भोजने यास विचारपुस करून त्यांचे कडुन गुन्हयातील रोख रक्कम ४४,११०/-रू दोन मोबाईल किंमत अंदाजे ३३,०००/- रु व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल किंमत अंदाजे ७०,०००/- रु असा एकुण १,४७,११०/- रू मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणातील फिर्यादीना पैशांची आवश्यकता असल्याने मालकाचे कलेक्शनचे पैसे देण्याचे टाळण्यासाठी दरोड्याचा बनाव रचुन खोटी तक्रार दिल्याचे सांगितले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शना खाली पोउपनि गोपाल जाधव, ए. एस. आय. दशरथ बोरकर, नापोको गोकुळ चव्हाण, पो. का स्वप्निल खेडकर पो. कॉ लिलाधर खंडारे, पो.कॉ शेख अन्सार, चालक, पो. कॉ. अक्षय बोबडे यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments