HomeCrimeबनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला LCB चा छापा...२० लक्ष रू.चा मुददेमाल...

बनावट रासायनिक खत बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला LCB चा छापा…२० लक्ष रू.चा मुददेमाल जप्त…एकास अटक….

संजय आठवले,आकोट

सद्यस्थितीत शेतक-यांच्या पेरणी हंगामास सुरुवात झाली असुन त्यानिमित्याने शेतकरी वर्ग बि बियाणे व खते खरेदीसाठी धावपळ करीत आहे. या धावपळीचा अनुचित लाभ घेण्यासाठी बनावट रासायनिक खते बनवून बाजारात त्याची विक्री करणा-या कारखान्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड घातली. ह्या कारखान्यातून २० लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अकोला स्थानीक गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक संतोष महल्ले यांना दि. १५जून रोजी माहीती प्राप्त झाली की, सध्या मान्सुन पेरणी हंगाम चालु असुन बाजारात मोठ्या प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत एक इसम एम. आय. डी. सी. अकोला येथे बनावट खत बनवून बाजारात विक्री करून शेतक-यांची व शासनाची फसवणुक करीत आहे.

अशा माहीतीवरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे पोउपनि गोपाल जाधव, पथक स्थानीक गुन्हे शाखा आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी अकोला यांचे संयुक्त पथकाने अकोला येथील एम. आय. डी. सी. फेज ४ मधिल एम. आर. फर्निचर मॉल चे बाजुला असलेल्या भंगार गोडावून चे बाजूच्या गोडाऊन मध्ये कार्यवाही केली. त्याठिकाणी आरोपी नामे राहुल नामदेव सरोदे वय ३५ वर्षे रा. नगर परिषद कॉलजी गौरक्षण रोड, अकोला हा अवैधरित्या बनावट खताचे उत्पादन करताना आढळून आला. त्यांचे कडुन सरदार डी. ए.पी. खत, आय पी एल डीएपी खत, महाधन १८:४६:० अशा नामवंत खताचे बैंकिंग साठी वापरात येण्या-या नवीन प्लास्टीक बारदाना, पॅकींग मशीन, बनावट रासायनिक खताचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्राबुल्स, सोडीयम सल्फेट चा कच्चा माल, इमलसीफायर लिक्वीड, खत बनविण्यासाठी वापरात येणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकूण २०,०५,७३०/- रू मुददेमाल जप्त करण्यात आला. पो.स्टे. एम. आय. डी. सी. अकोला येथे कलम ४२० भा.द.वि.सह कलम ७, १९, २१ खत नियंत्रण आदेश १९८५ कलम ३.९ अत्यावश्यक वस्तु कायदा १९६८ कलम ९.३ किटकनाशक नियम १९७१ कलम ४,६, ९, १०, १५ किटकनाशक आदेश १९८६ प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी राहुल नामदेव सरोदे वय ३५ वर्षे स.नगर परिषद कॉलणी गौरक्षण रोड, अकोला यास अटक करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत, पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल जाधव, ए. एस. आय. दशरथ बोरकर, नितीन ठाकरे, गापोकों गोकुळ चव्हाण, पो. कॉ. लिलाधर खंडारे, पो. का स्वप्निल खेडकर, पो. कॉ. अन्सार नापोकों अक्षय बोबडे तसेच डॉ. एम. श्री. इंगळे, कृषी विकास अधिकारी जि. प. अकोला, एम.डी. अंजाळ, मोहिम अधिकारी, एन एस लोखंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, एस. आर. जांभरुणकर, तालुका कृषी अधिकारी [व] कु. रोहिणी मोघाड, कृषी अधिकारी पं. स. अकोला यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments