Thursday, April 25, 2024
Homeराज्यअकोला | एका व्यक्तीपासून १० पेक्षा जास्त पदवीधर नोंदणी फॉर्म स्वीकारल्याबाबत शरद...

अकोला | एका व्यक्तीपासून १० पेक्षा जास्त पदवीधर नोंदणी फॉर्म स्वीकारल्याबाबत शरद झामरे यांची तक्रार…

Share

अकोला : सध्या अमरावती पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदारांची नोंदणी सुरु आहे, याधीची सर्वच मतदार यादी शासनाने खारीज केली होती, तर अश्याच काही उमेदवार आपापल्या परीने पदवीधरांची नोंदणी करून त्यांचे गठ्ठे शासनाच्या कार्यालयात जमा करीत असल्याचे पदवीधर युवा शक्ती असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष शरद झामरे पाटील यांच्या निर्दशनास आले असल्याने त्यांनी नियमानुसार फॉर्म स्विकारण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा यांना निवेदन दिले आहे.

शरद झामरे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, माझे माहितीनुसार पदविधर नोंदणी फॉर्म स्विकारतांना एका व्यक्तीने १० फॉर्म जमा करणे अपेक्षीत आहे. परंतु माझे असे निर्दशनास आले आहे की, आज सकाळी डॉ. निलेश अपार, उपविभागीय अधिकारी यांचेकडे काही व्यक्तींनी गट्टे चे गठ्ठे फॉर्म जमा केले आहेत. तरी आपण कृपया नियमानुसार फॉर्म स्विकारण्याबाबत सर्व संबधीतांना निर्देशित करावे ही विनंती.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: