Tuesday, April 23, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | बनावट देशी दारू कारखान्यावर विशेष पथकाचा छापा...४ आरोपी अटकेत...

अकोला | बनावट देशी दारू कारखान्यावर विशेष पथकाचा छापा…४ आरोपी अटकेत…

Share

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात येत असलेल्या बेलोरा या गावात बनावट देशी दारु बनविणाऱ्या कारखान्यावर अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून नकली देशी दारू व त्याची विक्री केल्या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पातुर तालुक्यातील बेलोरा या गावात नकली देशी दारू व त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता अकोला विशेष पथकाने छापा टाकला असता ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट देशी दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

यामध्ये, कच्चा माल स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट, अलकोहोल, फ्लेवर, खाली बोट्ल, झाकने, सीलिंग, लेबलिंग, पेकिंग 2 मशीन व साहित्य, बनावट दारुच्या 8 पेटया जप्त,खाली देशी दारू संत्रा, टैंगो पंच, असा लाख रूपयांचा मुद्देमाल जपत विशेष पथकाची कार्यवाही सुरु आहे…


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: