HomeBreaking Newsआकोटातील तपोभूमी श्रद्धासागरला लागलेल्या आगीत १२ लक्ष ५० हजाराचे नुकसान...

आकोटातील तपोभूमी श्रद्धासागरला लागलेल्या आगीत १२ लक्ष ५० हजाराचे नुकसान…

संजय आठवले – आकोट

महाराष्ट्र राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आकोट शहरातील तपोभूमी श्रद्धासागर येथिल पाकगृहाला लागलेल्या भिषण आगीत १२ लक्ष ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आकोट शहरापासुन दोन कि.मी. अंतरावर असलेले श्रद्धासागर हे राज्यातील लक्षावधी भावीकांचे श्रद्धास्थान आहे. ह्या ठिकाणी दिवसभर भावीकांचा राबता असतो. दि. १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताचे दरम्यान येथिल पाकगृहातुन अचानक धूराचे प्रचंड लोळ बाहेर पडू लागले. ते पाहून येथे आग लागल्याचे लक्षात आले.

त्यामूळे ऊपस्थितांमध्ये मोठी धावपळ सुरु झाली. संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी याना ताबडतोब पाचारण करण्यात आले. ह्यावेळी आकोट व तेल्हारा येथिल अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही दले घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर एका तासात नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आग विझल्यावर तलाठी दिनेश मोहोकार व मेतकर यानी नुकसानाचा पंचनामा केला. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जिवित हानी झाली नाही. परंतु १२ लक्ष ५० हजार रुपयांचे विविध साहित्य जळालेले आढळले. यामध्ये पाकगृहात साठविलेले धान्य, अन्य किराणा, पूजेचे साहित्य, टाळ, विणा, मृंदंग, बाज्याच्या पेट्या, गाद्या, संतरंज्या, आसन पट्ट्या आदी बिछायत साहित्य, खुर्च्या यांचे प्रचंड नुकसान झाले.यातील काही साहित्य दिंडीसोबत नेल्याने ते मात्र वाचले.

संत वासुदेव महाराज ज्ञानपिठ संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, विश्वस्त दिलीप हरणे, नंदकिशोर हिंगणकर, अशोकराव पाचडे, व्यवस्थापक अमोल मानकर यानी शेकडो भाविकांचे मदतीने प्रचंड धावपळ करुन आग विझविण्याची शिकस्त केली. या आग लागण्याचे निश्चित कारण मात्र कळू शकले नाही. परंतु हा प्रकार शॉक सर्किटमूळे झाला असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments