Homeगुन्हेगारीकुंटनखान्यावर आकोट ग्रामीण पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई...उपविभागीय अधिकारी यांचे आदेशावर...

कुंटनखान्यावर आकोट ग्रामीण पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई…उपविभागीय अधिकारी यांचे आदेशावर अमल…

आकोट- संजय आठवले

पो. स्टे. आकोट ग्रामीण हद्दीतील वडाळी सटवाई येथील गट क्रमांक ११७ मधील प्लॉटवर टिनपत्र्यांच्या झोपड्या बनवून तेथे कुंटनखाना चालविला जात असल्याची माहिती पोलीस स्टेशन आकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना मिळाली होती. त्यावरून दिनांक ३०.११.२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती विल्हेकर, पो. स्टे. आकोट ग्रामीणचे अंमलदार, पो. स्टे. आकोट शहरचे स्थानिक गुन्हे शाखा अंमलदार ह्यांनी संयुक्तिक कार्यवाही करून ग्राम वडाळी सटवाई येथील गट क्रमांक ११७ मधील जागेत टिनपत्र्याच्या झोपड्या बनवून कुंटनखाना चालविणाऱ्या ३ महिला, २ ग्राहक ह्यांच्यावर अप क्र. ४३८/२०२१ कलम ३,३ (ख), ४, ५, ५ (ग) (घ), ७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम सह कलम ३७०, ३४ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पडलेल्या ११ पीडित महिलांची सुटका केली होती.

त्यानंतर कलम १८ (१)(a)(b) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनिय अन्वये सदर जागेचा कुंटनखाना चालविण्यासाठी वापर होऊ नये ह्याकरिता सदर जागेतून व्यक्तींना निष्कासित करणे आणि कुंटनखाना सीलबंद करणे करीताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अकोला ह्यांना पाठविला होता.

त्यावरून तत्कालीन उपविभागीय अधिकारी आकोट श्रीकांत देशपांडे ह्यांनी सदर कुंटनखाना निष्कासित/ सीलबंद करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक आकोट ग्रामीण ह्यांना दिले होते.
त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दि.३०.११.२०२२ रोजी पो. स्टे. आकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोउनि पंचबुधे, सहा. पोउनि बोरोडे, पोहेकॉं भगत, नाहेकॉं सोनोने, पोशी शैलेश जाधव, सुरज अटालकर, वामन मिसाळ,सचिन कुलट, मपोशी शालिनी सोळंके, गीता भांगे, पूजा वानखडे तसेच मंडळ अधिकारी श्री अनिल ओइम्बे, तलाठी संजय तायडे, ग्रामसेवक माधव भांबुरकर ह्यांनी सदरचे कुंटनखाना चालविण्यासाठी वापर झालेल्या ग्राम वडाळी सटवाई येथील गट क्रमांक ११७ मधील टिनपत्र्याच्या खोल्या सीलबंद केल्यात.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व पो. स्टे. आकोट ग्रामीणचे अधिकारी व अंमलदार तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामपंचायत वडाळी सटवाईचे ग्रामसेवक ह्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments