Homeगुन्हेगारीआकोट पोलिसांनी केला सहा लाखाचा गुटखा जप्त...दोघास अटक...एक फरार...

आकोट पोलिसांनी केला सहा लाखाचा गुटखा जप्त…दोघास अटक…एक फरार…

अटक झालेल्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी…

आकोट शहरात गुटखा पुड्यांची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना पकडण्यात आकोट शहर पोलिसांनी यश प्राप्त केले असून तिसरा फरार झाला आहे. या दोघांना आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेची हकीकत याप्रमाणे आहे की, आकोट शहर पोलीस स्टेशनचे गस्तीपथक आकोट परिसरात गस्तीवर असताना गुप्त खबऱ्याने त्यांना माहिती दिली की,अंजनगाव येथून आकोट शहरातील धारोळी वेस या भागात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पुड्या आणल्या जाणार आहेत. ही माहिती गस्ती पथकाने आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांना दिल्यावर त्यांनी धारूर वेस परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नाकाबंदी केली असता पोलिसांना अपेक्षित वाहन येताना दिसले. पोलिसांनी ते वाहन रोखण्याचा ईशारा केला असता त्यातून खाली उडी मारून एक इसम फरार होण्यात यशस्वी झाला. या वाहनाची तपासणी केली असता, मोठ्या विमल गुटक्याचे प्रत्येकी दोनशे रुपये किमतीचे ४४० पॅकेट अंदाजे किंमत ८८ हजार रुपये, लहान विमल गुटखा पुड्यांचे प्रत्येकी १३० रुपये किमतीचे १४० पॅकेट्स किंमत १ लाख ३५ हजार, वाह गुटखा पुड्यांचे प्रत्येकी १३० रुपये किमतीचे २५६ पॅकेट्स किंमत ३३ हजार २८०, बहार पान मसाला प्रत्येकी २५० रुपये किमतीचे २०० पॅकेट किंमत पन्नास हजार रुपये या सोबतच वाहन चालकाचे खिशात गुटखा विक्रीचे ५६ हजार ३०० रुपये आढळून आले.

या ऐवजासह गुटखा पुड्या वाहून आणणारे वाहन अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकूण ६ लाख १२ हजार ७८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुटखापुड्यांची ही तस्करी करणाऱ्या पंकज बबनराव जैन वय ४२ आणि लक्ष्मण भैयालाल पानसे वय २५ दोघेही राहणार सावल मेंढा तालुका भैसदही जिल्हा बैतूल. या दोघांनाही अटक करण्यात आली. पळून जाणारा बाबत या दोघांनाही विचारणा केली असता,त्यांनी त्याचे नाव जगदीश कैसर असून तो तळोकारपुरा आकोट येथे राहत असल्याचे सांगितले. अटक करणाऱ्यांवर आकोट पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठोंबरे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments