Thursday, March 28, 2024
Homeगुन्हेगारीआकोट | शिवभक्तासोबत गैरवर्तन करणाऱ्या वनअधिकाऱ्यावर कारवाई करा…उपवनसंरक्षकाना‌ हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.

आकोट | शिवभक्तासोबत गैरवर्तन करणाऱ्या वनअधिकाऱ्यावर कारवाई करा…उपवनसंरक्षकाना‌ हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.

Share

आकोट – दिनांक १४ व १५ ऑगस्ट २०२२रोजी श्री क्षेत्र धारगड यात्रेत बंदोबस्ताकरिता तैनात असलेले आनंद सुरतने, कमलेश पाटील,एन.डी.पवार, प्रादेशिक वनविभाग परतवाडाचे भटकर या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवभक्तांना अश्लील शिवीगाळ व मारहाण केली आणि त्यांच्या मोटरसायकलची हवा सोडून गैरवर्तन केले यांचा हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त करीत निषेध केला व‌ उपवनसंरक्षक यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

वरील संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र धारगड गुफा यात्रेदरम्यान जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून श्री क्षेत्र धारगड यात्रा बंद करण्याचा कुटील डाव आखल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.पोपटखेड तपासणी नाका ते श्री क्षेत्र धारगड टी पॉइंट पर्यंत हे अधिकारी यात्रेदरम्यान बंदोबस्तात तैनात होते. वरील सर्व अधिकाऱ्यांनी शिवभक्तांना अरेरावीच्या भाषेत दमदाटी तसेच मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याच्या अनेक तक्रारी शिवभक्तांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रमाणे सुलई नाल्या नजीक १४ व १५ ऑगस्ट यात्रेदरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत ची परवानगी असताना दुपारी अंदाजे दोनच्या दरम्यान जाणीवपूर्वक शिवभक्तांच्या मोटरसायकल ना अडवणूक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलात ट्राफिक जाम झाला.

परिणामी शेकडो महिला, पुरुष, मुलांसह शिवभक्तांना‌ पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागली. इतकी पायपीट केल्यानंतरही काही शिवभक्तांना प्रवेश नाकारण्यात आला. जनावराचा अधिवास असलेल्या जंगलातून अंधारामध्ये झालेली पायपीट ही धोक्याची आहे. तसेच चेकिंग च्या नावावर मोटरसायकल मधून हवा सोडल्याने अनेक शिवभक्तांना जंगलात मध्यरात्रीपर्यंत अडकून राहावे लागले. वन अधिकाऱ्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आकोट शहरातील हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून या अधिकार्‍यांवर कारवाई होण्याकरिता विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, धारगड सेवा समिती व शिवसेनेच्या वतीने उपवनसंरक्षक आकोट वन्यजीव उपविभाग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, सुरेश अग्रवाल धारगड सेवा समिती, विजय चंदन विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष, सुनील देठे,सुनील पवार,अनंता मिसाळ, गोपाल कटाळे, सुनिल रंदे, निखिल गावंडे, सारंग कराळे, निशिकांत तळोकार, शिवा टेंमझरे, शुभम काळे, चेतन कडू, भारत वाळके, निलेश बोडखे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री क्षेत्र धारगड यात्रेदरम्यान शिवभक्तांशी गैरवर्तन करणाऱ्या व १०ते१५ किलोमीटर जिव धोक्यात टाकून जाणीवपूर्वक पायपीट करायला लावणार्‍या त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पुढील वर्षी २०२३ मध्ये रविवार व सोमवार असे दोन दिवस पूर्ण यात्रा भरविण्याची मुभा द्यावी…..
दिलीप बोचे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अकोला


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: