Thursday, March 28, 2024
Homeराज्ययंदाच्या देवी मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाही, पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरेंचा देवी मंडळांना...

यंदाच्या देवी मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाही, पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरेंचा देवी मंडळांना कारवाईचा इशारा, ध्वनिमापनासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात, २४१ जणांना करणार तडीपार…

Share

आकोट – संजय आठवले

यंदाच्या चार आँक्टोंबरला नवदुर्गा विसर्जनदिनी डीजेच्या दणदणाटाने नागरिकांच्या कानठळ्या बसणार नाहीत.कारण डीजेचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दस्तुरखुद्द शहर पोलिस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी नवदुर्गा मंडळांच्या बैठकित दिला आहे.

यंदा वाद्यांमुळे होणा-या ध्वनीप्रदुषणाचे मापन करण्यासाठी पोलास प्रशासनाने विविध पथके सज्ज ठेवली असून मिरवणूकीत बॉम्बशोधक श्वानपथकही तैनात राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कायदा व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक अहिरे यांनी सांगितले.

मिरवणूकीत जर कोणी डीजे व तत्सम ध्वनी प्रदूषण करणारी वाद्ये वाजवितांना आढळला तर यंत्राद्वारे त्याचे मापन करण्यात येऊन पंचासमक्ष देवी मंडळांवर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.तसेच डीजे वाद्यही जप्त केले जाईल, असे अहिरे म्हणाले.

यंदा “आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ आहे”..चालणार नाय!
डीजेवरील बंदीमुळे वाद्यशौकिनांना “आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ आहे”, या गाण्यानुसार डीजेचा आवाज वाढविता येणार नाही.त्यामुळे वाद्यशौकिनांनी डीजे वाजविण्याचा अट्टहास व भलतीच जिद्द करु नये; अन्यथा पोलिस कारवाई करतील,असे अहिरेंतर्फे सांगण्यात आले.

५७ नवदुर्गा मंडळांचा मिरवणूकीत सहभाग… – यंदाच्या देवी विसर्जन मिरवणूकी ५७ नवदुर्गा मंडळांचा सहभाग राहणार असल्याची माहिती शहर पोलिसांतर्फे देण्यात आली.

ड्रोन कँमेरा ठेवणार नजर… – आकोटच्या देवी विसर्जन मिरवणूकीवर ८४ सीसीटिव्ही कँमे-यांसह ड्रोन कँमेरा युनिटही नजर ठेवणार आहे.त्यामुळे आपल्याला कुणीतरी पाहतय याचे भान मिरवणूकीत सहभागी होणाऱ्यांनी ठेवावे, असेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

मिरवणूकीत प्रकाशाकरिता वेगवेगळ्या भागात २५ जनरेटर, लख्ख प्रकाश देणाऱ्या २०० दिव्यांची ची व्यवस्था करण्यात आली आहे.संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनोरे उभारण्यात आले आहेत. मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.तसेच मिरवणूकीत बॉम्बशोधक श्वानपथकही तैनात राहणार आहे.

सावली सभागृहात बैठक… – देवी विसर्जन चार दिवसांवर आले असल्याने नवदुर्गा मडळांचे पदाधिकारी व डीजे व्यावसायिक यांची संयुक्त मार्गदर्शन बैठक पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरिक्षक प्रकाश अहिरेंच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्यातील सावली सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाजाच्या तीव्रता व नियमांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.त्या प्रश्नांना पोलिस प्रशासनाकडून समर्पक उत्तरेही देण्यात आली.

विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी व अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलीस ठाण्यांतर्गत नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीत महिलांची छेडछाड होऊ नये, यासाठी महिलांच्या सुरक्षतेसाठी स्वतंत्र महिला पथक नेमण्यात आले आहे. शहर पोलीसांतर्फे मिरवणूक संपेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे, असे सांगण्यात आले.

वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करा… – मुख्य मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा,असे आवाहन पोलिस प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

शहरातून २४१ जण होणार तडीपार… – कलम १४४ प्रमाणे २४१ जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असून, लवकरच त्यांना तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

शहरात तगडा पोलीस बंदोबस्त – आकोट येथील देवी शोभा यात्रेत जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक स्वतः उपस्थित राहणार असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ०२ उपविभागीय पोलिस अधिकारी,४० पोलिस अधिकारी, ४७१ पोलिस अंमलदार, १७० गृहरक्षक दलाचे जवान,०३ आर सी पी पथक, ०१ एस आर पी एफ चे पथक तैनात राहणार आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: