Homeराज्यकोगनोळी ग्रामस्थ व प्रजावाणी फाउंडेशनच्या वतीने अमर विटे यांचा सत्कार...

कोगनोळी ग्रामस्थ व प्रजावाणी फाउंडेशनच्या वतीने अमर विटे यांचा सत्कार…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता. निपाणी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अमर आप्पाजी विटे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोगनोळी ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस चिक्कोडी जिल्हाध्यक्ष जावेद काझी यांनी दिले. या झालेल्या निवडी मुळे त्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कोगनोळी ता. निपाणी येथील ग्रामस्थ व प्रजावाणी फाउंडेशनच्या वतीने अमर विटे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक लक्ष्मण जगताप यांनी केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन कानडे यांनी अमर विटे यांच्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. या केलेल्या सत्काराबद्दल अमर विटे यांनी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानून आपण येणाऱ्या काळात गोरगरीब व वंचित घटकासाठी काम करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी अँड प्रशांत नवाळे, सचिन परीट, युवराज परीट, सिद्धाजी विटे, सागर नवाळे, कुमार रजपूत, नागेश मधाळे, युवराज विटे, सचिन कुंभार यांच्यासह प्रजावाणी फाउंडेशनचेे कार्यकर्ते व युवक ,ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी आभार सयाजी गायकवाड यांनी मानले….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments