Friday, April 26, 2024
Homeराज्यअमोई फेस्टिवल २०२३ चे उत्साहात समारोप...

अमोई फेस्टिवल २०२३ चे उत्साहात समारोप…

Share

नरखेड – अतुल दंढारे

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी वर्गानी विविध कौशल्ये आत्मसात करून आपले करिअर घडविणे आवश्यक असून यात शिक्षकांनी योग्य मार्गदर्शकाची भूमिका पार पाडल्यास उद्याचे सशक्त नागरिक या तरुण पिढीतून घडतील तसेच आपण क्रीडांगणावर जाऊन उत्तम खेळाडू बना आणि आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहा असे प्रतिपादन अमोई फेस्टिवल 2023 च्या समारोपीय कार्यक्रमात श्री मनोजजी चौधरी,ठाणेदार ,पोलीस स्टेशन,जलालखेडा यांनी केले.

अंत्योदय मिशन, देवग्राम या संस्थेचा अमोई फेस्टिवल -2023 चा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा भावपुर्ण सत्कार जीवन विकास महाविद्यालय देवग्रामचे प्राचार्य यांच्या हस्ते पार पडला. आजच्या या उदघाटनीय स्नेहसंमेलन कार्यक्रमात काटोल येथील समाजसेवक श्री प्रकाशजी वसू हे अध्यक्षस्थानी होते.

या समारोपीय सोहळ्यात कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद ,सदस्य ,येनवा सरकल , श्री समीर उमप ,ठाणेदार श्री मनोज चौधरी, माजी सभापती ,पंचायत समिती नरखेड, गटशिक्षणाधिकारी श्री विशालसिंह गौर, प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे ,मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे, मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर, मुख्याध्यापिका पूजा बोन्द्रे उपस्थित होते.

या अमोई फेस्टिवलच्या या स्नेहसंमेलनात विविध बौध्दिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धामध्ये वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, फॅशन स्पर्धा विज्ञान प्रदर्शणी, पोस्टर्स स्पर्धा ,सांस्कृतीक स्पर्धा आणि क्रीडांगणाच्या माध्यमातून उत्तम खेळाडू तर व्हावा आणि आरोग्य सुदृढ, निरोगी राहण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या स्पर्धकांना मोमेंटो बक्षिसे कार्यक्रमाचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

बक्षीस वितरण डॉ. मंगेश आचार्य आणि कराटे कोच श्री नरेंद्र बिहार यांनी केले। या अमोई फेस्टिवल च्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री धनराज पांडव यांनी केले तर Bआभार मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर यांनी केले, कार्यक्रमाला सर्वच प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला . जीवन विकास परिवारातील विधार्थांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: