अमरावती – बडनेरा येथील एका 17 वर्षीय युवकांची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याच्या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल हिवराळे वय वर्ष १७ असे मृत युवकाचे नाव असून तो रा. पाच बंगला जुनी वस्ती येथील रहिवाशी होता.
याबाबत सविस्तर असे की मिल चाळ परिसरात राहणारा विशाल महेश हिवराळे याचे भोकरी उर्फ रुकसाना वय 27 या महिलेसोबत अनैतिक संबंध होते त्याचे तिच्याकडे येणे-जाणे होते मयत विशाल ने तिच्याकडे जाऊ नये म्हणून मिराज खान राहणार मोमिनपुरा बडनेरा हा नेहमी धमकावत असे दिनांक 15 जून च्या संध्याकाळी मृतक विशाल याचे प्रेत पाच बंगला स्थित पवार यांच्या वाडीतील विहिरीत आढळून आले त्यावरून मृतकांचे नातेवाईकांनी विशालचा खून झाला असून त्याला विहिरीत टाकल्याचा आरोप करीत पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
विष्णू महेश हिवराळे यांनी दिलेल्या या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अपराध क्रमांक 493/2022 चे कलम 302 भादवी 34 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलीस करीत आहे वृत्त लिहीपर्यंत आरोपीस अटक केली नसल्याचे सांगण्यात आले विहीरीतून प्रेत काढण्याकरिता अमरावती महानगरपालिका अग्निशामक दलाने दिनांक 16 ला घटनास्थळी जाऊन प्रयत्नाची पराकाष्टा करीत प्रेत काढून पोलिसांच्या ताब्यात दिले याप्रसंगी कर्तव्यावर असलेले अग्निशामक दलाचे चालक भोंगरे, फायरमॅन राजू शेडे, धनराज कांदे, वैभव गजभारे, शरद भांदरंगे, मनोज इंगोले यांनी परिश्रम घेतले