Tuesday, April 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | शेतकर्यांच्या शेतातील मोटार पंप व इतर साहित्य चोरणारी टोळी गजाआड...स्थानिक...

अमरावती | शेतकर्यांच्या शेतातील मोटार पंप व इतर साहित्य चोरणारी टोळी गजाआड…स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

Share

अमरावती ग्रामीण भागातील शेतकर्यांना चोरट्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकर्यांच्या शेतातील प्लास्टिक केबल, मोटर पंप चोरी करणारी टोळी अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून या टोळीतील सहा जणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३,०६,५००/-रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. १) शाम उर्फ राजेश भोसले २) अंकुश पर्वतसिंग पवार ३) आकाश पर्वतसिंग पवार तिन्ही रा. तरोडा, ४) सागर रतन पवार रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे ५) कांजा कमराज भोसले वय ३० वर्ष रा काळा गोटा ६) लोकेश जरतारी पवार रा तरोडा असे आरोपींचे नावे आहेत.

मागील काही दिवसांपासुन चोरांनी अमरावती ग्रामीण भागामध्ये शेतकर्यांच्या शेतामधील मोटारपंप,केबल, स्प्रींकलर पाईप ईत्यादी शेती अवजारे चोरीचा सपाटा लावला असता पोलीस अधीक्षक सा, अमरावती (ग्रामीण) यांनी जिल्हयात होत असलेल्या शेतकर्यांच्या शेतातील शेती केबल, मोटार पंप व इतर साहित्य चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर चोरीचे गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना निर्गमित केल्या होत्या. त्यांअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सदर गुन्हयांचा समांतर तपास करणेसुरु केला असता पो.स्टे. चांदुर रेल्वे येथे दाखल अप क्रमांक ५१३ / २२ कलम ३७९ भादविगुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजाकालागोटा ता. तिवसा येथे राहणारा शाम ऊर्फ राजेश भोसले याने व त्याचे साथीदारांनीकाही शेतांमधील मोटारी व स्प्रींकलर पाईप चोरून त्याचे शेतामध्ये लपवुन ठेवले आहेत.

स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळ न घालवता अथक परिश्रम घेवुन शिताफीने शाम ऊर्फराजेश भोसले यास व त्याचा साथीदार लोकेश जारतरी पवार यांना ग्राम कालागोटा येथूनताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीचेउत्तरे दिली. परंतु त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी सदरची चोरी हित्याचे साथीदार नामे ३) आकाश पर्वतसिंग पवार रा. तरोडा ४) सागर रतन पवार रा. शिवाजी नगर,चांदुर रेल्वे ५) कांजा कमराज कमराज भोसले वय ३० वर्ष रा काळा गोटा ६) अंकुश पर्वतसींगपवार रा तरोडा यांचे सोबत मिळून केली आहे. आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांनाविचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्या बाबत कबुली दिल्याने त्यांचेताब्यातुन गुन्हातील मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुन ३,०६,५००/-रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सदर आरोपीं कडून अमरावती ग्रामीण मधील पोलीसस्टेशन चांदुर रेल्वे येथिल ०७ गुन्हे, तिवसा येथिल ०२ गुन्हे तसेच कु-हा व दत्तापुर येथप्रत्येकी ०१ गुन्हा असे एकुन ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. नमुद आरोपी व मुददेमाल पुढीलकारवाई कामी पो.स्टे चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपींकडून आणखीगुन्हे उघड होण्याची शक्यता असुन पुढील तपास पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे करित आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक साो श्री. अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षकश्री. शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा,अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मो. तसलीम शेख, सुरज सुसतकर, पोउपनीनितीन चुलपार व त्यांचे पथकातील सपोउपनि त्रंबक मनोहर, श्रेणी पोउपनी मुलचंद भांबुरकर,संतोस मुंदाणे, पुरुषोत्तम यादव, शरद माहुलकर, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, सुनिल महात्मे,दिपक सोनाळेकर, अजमत सैयद, रविन्द्र व-हाडे, चंद्रशेखर खंडारे, निलेश डांगोरे, सचीन मसांगे,पंकज फाटे, सागर नाठे, अमोल केन्द्रे, सचीन मिश्रा, चालक हर्षद घुसे, संदिप नेवारे, राजेशसरकटे तसेच सायबर सेल चे सागर धापड यांनी केली. सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखाअमरावती ग्रामीण यांनी केली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: