Homeगुन्हेगारीअमरावती | अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती...जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकरण...

अमरावती | अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती…जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकरण…

अमरावती जिल्ह्यात बालविवाह सुरू असल्याच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अमरावतीच्या खोलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत १७ वर्षीय अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार पुढे आला आहे. युवती प्रसूती करिता जिल्हा स्त्री रुग्णालयात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी आरोपी अमित पवार विरुद्ध अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. आरोपी अमित आणि अल्पवयीन युवती नातेवाईक आहेत. २०२१ मध्ये त्यांचा बालविवाह झाला असल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. आणि यातूनच अल्पवयीन युवती गर्भवती झाली असल्याच पोलीस तपासात पुढे आलेलं आहे.

संघरक्षक भगत, सहायक पोलीस निरीक्षक, खोलापुर पोलीस स्टेशन
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments