Saturday, April 20, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | आंतरराज्यीय ईराणी टोळीतील नकली लुटारू पोलीस ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या...

अमरावती | आंतरराज्यीय ईराणी टोळीतील नकली लुटारू पोलीस ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

Share

अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने आंतरराज्यीय ईराणी टोळीतील नकली लुटारू पोलिसांना जेरबंद केले आहे. चोरी करण्याकरीता हे चोरटे सतत नवनविन युक्त्या शोधून चोऱ्या करूण सामान्य जनतेस लुटत असत. असाच प्रकार अमरावती ग्रामिण घटकातील पोलीस स्टेशन वरूड हदिदतील ग्राम झोलंबा येथील वयोवृद्ध ईसम सुभाष गोविंदराव बदरे, वय ६७ वर्षे या ईसमासोबत घडला. हसनी अली उर्फ खुराक आजम अली, (ईराणी) वय 32 वर्षे, रा. ईराणी मोहल्ला, शिवाजी नगर परही वैजनाथ जि. बीड. असे आरोपीचे नाव आहेत.

दिनांक ३०/०९/२०२२ रोजी दुपारचे वेळी नमुद ईसम वरूड येथूण बाजार करूण गावी परत जात असतांना बाजारात त्यास ०३ ते ०४ ईसमांनी दुचाकीने येवूण थाबविले आणि आम्ही काईम ब्रान्च येथील पोलीस असल्याचे सांगीतले व समोर खून झाला असून लुटमार सुरू असल्याची खोटी बतावनी करूण नमुद ईसमाकडील मौल्यवान दागीणे काढूण ठेवण्यास सांगूण त्याचे जवळील ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचालाखीने काढून घेतली आणि घटनास्थळावरूण पसार झाले.

नमुद वयोवृद्धास आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने लगेच वरूड पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची तक्रार नोंद केल्यावरूण पोलीस स्टेशन वरूड येथे गुन्हा नोंद करूण तपासात घेण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शक सुचना केल्यानंतर त्या अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या करीता कसाशीने प्रयत्न करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनिय माहीती आणि तांत्रिक पुराव्यावरूण सदर गुन्हयातील आरोपी हे पोलीस बतावनी करूण वयोवृद्धांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय ईराणी टोळीतील महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथील आणि मध्य प्रदेशातील भोपाळचे असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीतांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत मागील महीणा – भन्यापासूण वेगवेगळया राज्यात शोध घेणे सुरू होते.

दिनांक ०२ / ११ / २०२२ रोजी नमुद आरोपी हे मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात असल्याची माहीती मिळल्यावरूण स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीनच्या पथकाने अतीशय जलदगतीने ६५० किलोमीटर अंतर कापूण सायंकाळी ०५/०० वा. सुमारास रिवा (मध्य प्रदेश) येथे पोहचूण तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने नमुद आरोपीतांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यामधील एक आरोपी हसनी अली उर्फ खुराक आजम अली, वय ३२ वर्षे, रा. ईरानी मोहल्ला, शिवाजी नगर परळी वैजनाथ यास ताब्यात घेण्यात आले असूण ईतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडूण वरूड येथे गुन्हा करतेवेळी वापरलेली पल्सर कंपनिची ०१ मोटार सायकल, दिल्ली काईम ब्रांचचे नकली पोलीसाचे ओळखपत्र, ०१ मोबाईल, नगदि ३,८०० रु. असा एकूण ९३,८०० रू. चा मुद्देमाल हस्तगत करूण मुद्देमालासह आरोपीस पोलीस स्टेशन वरूड यांचे ताब्यात देण्यात आले असूण नमुद आरोपीकडूण अधिक गुन्हे ऊघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (प्रा.) चे पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस अंमलदार संतोष मुंदाने, रविंद्र बावने, दिपक सोनाळेकर, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, चालक कमलेश पाचपोर यांनी केली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: