Homeराजकीयअमरावतीत ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचा बोलबाला...तर एका जागेवर भाजप...

अमरावतीत ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचा बोलबाला…तर एका जागेवर भाजप…

अमरावती जिल्ह्यात काल पाच ग्रामपंचायतमध्ये मतदान पार पडल्यानंतर आज तासाभरात मतमोजणी पार पडली, तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचातीत काँग्रेसने बाजी मारली तर चांदुर रेल्वे तालुक्यात चांदूरवाडी येथे भाजपने बाजी मारली. धारणी तालुक्यात हरिसल येथे युवकांनी ग्रामपंचायत जिंकली असून अमरावती तालुक्यात रोहणखेडा आणि आखतखेडा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली आहे.

यात तिवसा तालुक्यात माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे,घोटा ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसच्या रुपाली राऊत व कवाडगव्हाण ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी ह्या विजयी झाल्यात,तिवसा मध्ये तिन्ही ग्रामपंचायतवर यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेसने बाजी मारली तर चांदुररेल्वे तालुक्यातील चांदुरवाडी ग्रामपंचायत मध्ये भाजप आमदार प्रताप अडसळ यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी झाल्यात.

तसेच धारणी तालुक्यातील हरिसार ग्रामपंचायत मध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे रामेश्वर दारशिंबे विजयी झाल्यात, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच सरपंच पदाची निवडणूक जनतेतुन झाली यात राष्ट्रवादी, शिवसेना व शिंदे गटाचा याला एकही जागा जिंकता आली नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments