HomeMarathi News Todayअमरावती | माझी खोटी बदनामी करू नका !...'त्या' तरुणीने केली विनंती...

अमरावती | माझी खोटी बदनामी करू नका !…’त्या’ तरुणीने केली विनंती…

अमरावती – शहरातील हमालपुरा येथील रहिवाशी असलेली तरुणी काल रात्री साताऱ्याहून अमरावती परत आली असता तिने प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाली, मला मेडिकल संदर्भात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता मात्र माझ्या कुटुंबियांच्या याला विरोध असल्यामुळे मला राग आल्यामुळे मी घरून निघून गेली होते असे असताना खासदार नवनीत राणा यांनी माझ्याबाबत चुकीचे वक्तव्य करून माझी बदनामी केली असल्याचे तरुणीने म्हटले आहे. तर या प्रकरणी अमरावती पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

मंगळवारी अचानक घरून निघून गेलेली युवतीवर लव्ह जिहादचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. अमरावती पोलिसांनी या युवतीचा शोध घेतला असता ती सातारा येथे आढळून आली. गुरुवारी दुपारी एक वाजता या युवतीला घेऊन अमरावती पोलिस सातारा येथून अमरावतीच्या दिशेने निघाले होते आज पहाटे साडेपाच वाजता ही युवती अमरावती दाखल झाली. या युवतीला पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

Crime Story | ‘तो’ प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पत्नीला व्हिडिओ कॉल करायचा…कंटाळून पत्नीने केले हे कृत्य…

या प्रकरणी बुधवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मोठा राडा केला होता, आमची मुलगी लव जिहाद अंतर्गत पळवून नेली व तिला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या प्रकरणावरून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात या अमरावती लव्ह जिहाद ची चर्चा होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांना सोशल मिडीयावर चांगलेच धारेवर धरले आहे. सोबतच पोलिसांची अरेरावी केल्याबद्दल पोलीस बॉईज संघटनेने खासदार राणा यांचा निषेध सुद्धा केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments