Homeगुन्हेगारीअमरावती । दडबडशहा दर्गा येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा...LCB अमरावती ग्रामीण पोलिसांची दमदार...

अमरावती । दडबडशहा दर्गा येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा…LCB अमरावती ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी…

अमरावती : अकोला रोडवरील दडबडशहा दर्गा येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. बडनेरा जवळील दडबडशाह बाबा दर्ग्यात दोन इसमांचे रक्ताने माखलेले मृतदेह दिनांक १५/९/२०२२ रोजी आढळलुन आले होते, येथे काही अज्ञात इसमांनी दडबडशहा येथील मुजावर (पुजारी) अनवर बेग अकबर बेग व तेथेच काम करणारा तौफिफ शेख राजीक शेख यांचा अतिशय क्रूरतेने निर्घुन हत्या केली होती.

सदर घटनेचे अनुषंगाने पोलीस स्टेशन लोणी येथे अप.क्र. २७१/ २०२२ कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके ही सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना घटनेच्या अनुषंगाने सर्व बाबींचा बारकाईने व सखोल तपास करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, यातील आरोपी लक्ष्मण गोरख पिंपळे हा मागील बरेच वर्षापासून दडबड शहा दर्गा येथे राहुन काम करीत होता व भाविकांकडून मिळणाऱ्या देणगी मधून आपला उदरनिर्वाह करीत होता. परंतु काही दिवसापुर्वी अनवर शहा अकबर शहा रा. लालखडी, अमरावती हा तेथे नवीन मुजावर म्हणुन देखरेख करीत होता.

लक्ष्मण गोरख पिंपळे याचे काहि दिवसांपूर्वी अनवर बेग अकबर बेग याचे सोबत वाद निर्माण झाल्याने अनवर बेग अकबर बेग याने लक्ष्मण गोरख पिंपळे यास तेथे राहण्यास मनाई केली होती. त्यामुळे लक्ष्मण गोरख पिंपळे हा स्वतः माझे मुळगावी निघुन गेलो. परंतु लक्ष्मण गोरख पिंपळे याचे मनामध्ये मृतकांविरुद्ध रोष असल्याने त्याने बेलोलपुर येथील राहणारा दिपक पवार याचे मदतीने दडबडशहा येथील मुजावर (पुजारी) अनवर बेग अकबर बेग व तेथेच काम करणारा तोफिफ शेख राजीक शेख यांची सुरा या हत्याराने गळ्यावरुन घाव मारुन हत्या केली. अशी कबुली लक्ष्मण गोरख पिंपळे याने दिल्याने दिपक पवार यास ताब्यात घेवुन सदर दोन्ही आरोपी यांना गुन्हाचे अनुषंगाने पुढील कारवाईकामी पोस्टे लोणी यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक, शशिकांत सातव, श्री. सुर्यकांत जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचे नेतृत्वात सपोनी रामेश्वर धोंडगे, पोउपनि नितीन चुलपार, पोउपनि सुरज सुसतकर, पोउपनि मो. तसलीम व त्यांची पथके, सायबर पोलिस स्टेशनचे सपोनि ईश्वर वर्ग व त्यांचे पथक तसेच पोस्टे लोणी येथील सपोनी मिलींदकुमार धवने व अंमलदार यांनी केली.

पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण करिता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments