Friday, March 29, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | पिकअप वाहनाचा भीषण अपघात...७ मजुरांचा मृत्यू...१० जण जखमी...

अमरावती | पिकअप वाहनाचा भीषण अपघात…७ मजुरांचा मृत्यू…१० जण जखमी…

Share

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात महाराष्ट्राच्या सीमेलगत मध्य प्रदेशची सीमा असून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील तापी नदीच्या पुलासमोर ऊसाने भरलेला ट्रक व मजुर घेऊन जाणार्या पिकप वाहनामध्ये अमोरासमोर भिडत झाली. यामध्ये जाग्यावर सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. त्यात एका युवकाचा रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे.

दुपारी दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असुन जखमींना तातडीने खंडवा बुराहनपुर शासकीय रुग्णालयात ऐथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सदर मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सुंदरदेव येथील काही आदिवासी परिवार महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात महिन्या आधी रोजगार करिता गेले होते.

आज दिनांक 1 फेब्रुवारी बुधवार रोजी अकोट वरून पिकअप वाहनाने आपला गावी परत येत असताना समोरून भरधाव वेगाने येत असणाऱ्या एका उसाच्या ट्रकासोबत समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. पिकप वाहनामध्ये एकूण 22 नागरिक प्रवास करत असून अपघातात सात नागरिकांचा मृत्यू झाला…


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: