HomeMarathi News Todayअमरावती | आमदार रवी राणांचे पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप...म्हणाले...

अमरावती | आमदार रवी राणांचे पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप…म्हणाले महिन्याला ७ कोटी रूपये…

अमरावती | बडनेरा आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यात बरेच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांची शृंखला सुरु असून पोलीस आयुक्त आरती सिंग यांना गणपती विसर्जना नंतर बदली करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले होते, मात्र आता राणा यांनी पोलीस आयुक्त आरतीसिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आरती सिंह यांनी अडीच वर्षात महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहचवले. असे गंभीर व्यक्तव्य केले आहे.

तर या प्रकरणाची आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रवी राणा यांनी दिली आहे.“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरती सिंह यांना एकसुत्री कार्यक्रम दिला होता. खासदार नवनीत राणा आणि रवी राणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवा, असे निर्देश दिले होते. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी एका प्राध्यापकाला आमच्यावर पोक्सोसारखा गुन्हा दाखल करावं म्हणून आरती सिंह यांनी प्रवृत्त केलं,” असा आरोपही राणांनी लावला आहे.

“महापालिका आयुक्त यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. तेव्हा मी दिल्लीत होतो, तरीही माझ्यावर ३०७, ३५३ सारखे गुन्हे दाखल करण्यात आले. शेतकऱ्यासांठी दिवाळीत आंदोलन केलं, त्यावेळी दोन दिवस मला जेलमध्ये टाकण्यात आलं. तर, नवनीत राणा यांना नजरकैदमध्ये ठेवले गेले. उमेश कोल्हे हत्या प्रकरण सुद्धा आरती सिंह यांनी दाबण्याचा प्रयत्न केला,” असेही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments