अमरावती – राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या २०२०-२१ मध्ये झालेल्या माझी वसुंधरा २.० स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेने अमृत गटात विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत रविवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला.
पंचतत्त्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या या स्पर्धेत “अमृत” गटामध्ये विभागस्तरावर अत्युत्कृष्ट कामगिरीकरिता अमरावती महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी माझी वसुंधरा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल महानगरपालिका कर्मचारी / कामगार संघ व भारतीय मजदूर संघ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपायुक्त सुरेश पाटील, मुख्यलेखाधिकारी हेमंत ठाकरे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अग्निशमन अधिक्षक सय्यद अनवर, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, उपाध्यक्ष कमलाकर जोशी, प्रमोद मोहोड, विष्णु लांडे, आकाश तिरथकर, गुलशन मिरानी, धरम भिवाळ, प्रतिभा घंटेवार, पद्मा पवार,
संजय बगाळे, प्रदिप लुंगे, देवेंद्र बायस्कर, पंकज बोरकर, अहमद निसार, धिरज माकोडे, शैलेंद्र शर्मा, निलेश बावीस्कर, नितीन गोडबोले, देविदास काकडे, अशपाक सिध्दीकी, आशिष सालोरकर, अजय चव्हाण, कुणाल बांबल, गणेश काकडे, राहुल खरे, कपिल सारसर, अश्विनी लोंदे, वर्षा वाटाणे, दिप संगेले, मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.