Homeगुन्हेगारीAmravati | कॅफेमध्ये सुरु होते अश्लील चाळे...पाच जोडप्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

Amravati | कॅफेमध्ये सुरु होते अश्लील चाळे…पाच जोडप्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

Amravati Crime : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका कॅफेवर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली असता पाच प्रेमी युगलांना ताब्यात घेतले असून कॅफे मालकासह इतर जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून संबधित कॅफेवर कारवाई करून त्याला सील करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज सोमवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास राजापेठ पोलिसांनी शहरातील दसरा मैदान रोडवरील स्वस्तिक नगर चौक स्थित मार्निंग ब्लेंड कॅफेवर धाड टाकून पाच प्रेमीयुगुलांना पकडण्यात यश आले आहे. पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रशाली काळे यांच्या नेत्तृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वस्तिक नगर चौक स्थित मार्निंग ब्लेंड कॅफेमध्ये अनधिकृत प्रकार चालत असल्याबाबत पोलिसांना अनेक दिवसांपासून कुणकुण लागली होती. पोलिसांनी आज याठिकाणी पाच प्रेमीयुगल अश्लील प्रकार करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत पाच प्रेमीयुगलाला पकडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments