HomeMarathi News Todayअमरावती । दोन युवकांच्या हत्येनं हादरले शहर...जिल्ह्यात एकूण चार हत्याकांड...

अमरावती । दोन युवकांच्या हत्येनं हादरले शहर…जिल्ह्यात एकूण चार हत्याकांड…

अमरावती जिल्ह्यात हत्येचं सत्र थांबायचे नाव घेत नसून कालच्या दिवशी शहरात दोन हत्याकांड घडून आले तर जिल्ह्यात दोन असे एकूण कालच्या दिवशी चार हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात धारणी तालुक्यातील दोन, अमरावती शहरातील दोन झाल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे कारण एकीकडे गणेशोत्सव यासाठी असलेला बंदोबस्त तर दुसरीकडे घडणाऱ्या घटना.

सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या जवाहर गेट जवळील मनपा संकुलात एका 25 वर्षीय युवकाची चौकीदारासोबत झालेल्या वादातून हत्या झाली असून शुभम गुल्हाने असे युवकाचे नाव असून या प्रकरणी चौकीदारावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील दुसरी घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येत असलेल्या छत्री तलाव ते भानखेडा रोडवर सायंकाळच्या सुमारास घडली, संतोष ऊर्फ पापा किशोर पछेल वय अंदाजे 35, राहणार सुदर्शन नगर फ्रेजरपुरा असे मृतकाचे नाव आहे..इवनिंग वॉक करीता छत्री तलाव रस्त्याने जात होता.. गुरूवारी संध्याकाळी मृतक संतोष ईवनिंग वॉक ला जात असताना हनुमान मंदिर समोरील भानखेडा रस्त्यांवरील चढाव च्या रस्त्या बाजूने मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मानेवर चायना चाकूने तिष्न घाव करून पोटात ही चाकू खुपसला. तो बाहेर न निघाल्याने अज्ञात आरोपी ने चाकू पोटात च सोडून पलायन केल्याची पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या कोणी आणि का केली या तपासात आता फ्रेजरपुरा पोलीस लागले आहे. शहरात गणपती स्थापना झाल्यावरच दोन हत्या होणे ही शहर पोलिसांना आव्हानच झाले आहे.

जिल्ह्यातील तिसरी घटना धारणी तालुक्यातील बोराटी गावात आरोपी युवक व महिलेमध्ये शेतीच्या धुरावर बैल चारण्याच्या कारणावरून वाद झाला. महिलेसोबत युवकाची झटापट झाली. यात शेतीच्या वादातून आरोपीने धुर्‍यावर महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून महिलेची हत्या केली. ही महिला 40 वर्षे वयाची आहे. महिलेचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत शेती बांधावर पडून होता. या प्रकरणी धारणी पोलिसांनी सचिन उर्फ रम्मू दारसींभे वय 26 वर्ष याला अटक केली. तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.

जिल्ह्यातील चौथी घटना धारणी तालुक्यातील सुसरदा या गावातील असून दारू पितांना दोन भावात वाद झाला, वाद एवढा विकोपाला गेला की लहान भावाने मोठ्या भावाला जबर मारहाण केली यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला, गंभीर भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मगनसिंग अर्जुनसिंग सूर्यवंशी वय 40 असे मृतकाचे नाव असून आरोपी मंगलसिंग याच्यावर धारणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments