Homeशिक्षणअमरावती | अनन्‍या सुनिल क्षिरसागर ९५.६० टक्‍यांनी उत्‍तीर्ण...

अमरावती | अनन्‍या सुनिल क्षिरसागर ९५.६० टक्‍यांनी उत्‍तीर्ण…

अमरावती – अनन्‍या सुनिल क्षिरसागर या विद्यार्थीनीने इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत ९५.६० टक्‍के गुण मिळवून मेरीट श्रेणीत उत्‍तीर्ण झाली आहे. विषेश म्‍हणजे वडीलांचे छत्र हरविले असतांना तिने जिद्दीने अभ्‍यास करुन हे घवघवीत यश मिळविले आहे.

अनन्‍या क्षिरसागर (राहणार छांगानी नगर) ही श्री. समर्थ माध्‍यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. अनन्‍याच्‍या वडीलांचे निधन झाल्‍यानंतर तिची आई करुणा सुनिल क्षिरसागर यांनी तिची जबाबदारी सांभाळली. करुणा क्षिरसागर ह्या खाजगी रुग्‍णालयात काम करुन अनन्‍या व तिचा लहान भाऊ समर्थ याचा उदरनिर्वाह चालवीत आहे. घरातला कर्ता पुरुष गेला असला तरी करुणा क्षिरसागर ह्या खचल्‍या नाही. आपल्‍या मुलीने शिकून मोठे व्‍हावे असे त्‍यांचे स्‍वप्‍न आहे.

अनन्‍यानेही त्‍यांचे स्‍वप्‍न साकारण्‍याच्‍या दृष्‍टीने वाटचाल सुरु केली असून त्‍याचा पहिला टप्‍पा म्‍हणून तिने दहावीच्‍या परिक्षेत घवघवीत यश मिळवून दाखविले आहे. विशेष म्‍हणजे तिने संस्‍कृतमध्‍ये १०० पैकी तब्‍बल ९९ गुण प्राप्‍त केले आहे. याशिवाय इतर सर्व विषयांमध्‍येही तिने डिक्‍टेंशन पेक्षा अधिक गुण मिळविले आहे.

त्‍यानुसार एकुण ५०० पैकी ४७८ गुण तिला प्राप्‍त झाले आहे. आपल्‍याला भविष्‍यात अभियांत्रीकी क्षेत्रात जायचे असल्‍याचे अनन्‍याने सांगीतले. आपल्‍या यशाचे श्रेय तिने आई सह शिक्षकांना दिले आहे. तिच्‍या यशाचे सर्वस्‍तरातून कौतुक होत आहे. तिच्‍या या यशाबद्दल आजी शकुंतला बाळापुरे, मामा चंद्रकांत बाळापुरे, सचिन बाळापुरे, मावशी लता चिखलकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.      

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments