Homeव्यापारएंजल वन बनली द बेस्ट प्लेस टू वर्क इन फिनटेक', भारतातील टॉप...

एंजल वन बनली द बेस्ट प्लेस टू वर्क इन फिनटेक’, भारतातील टॉप १०० बेस्ट वर्कप्लेसेसपैकी एक ठरली…

फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने भारतातील काम करण्यासाठी सर्वोत्तम स्थळांपैकी एक म्‍हणून उदयास येण्यासाठी अनेक मान्यता प्राप्त केल्या आहेत. कंपनीने भारतातील टॉप १०० बेस्ट वर्कप्लेसेसमध्ये स्थान मिळवण्यासोबत ग्रेट प्लेस टू वर्क® इन्स्टिट्यूटकडून उद्योगक्षेत्रातील बेस्ट फिनटेक वर्कप्लेस म्हणून मान्यता मिळवली आहे.

कंपनीने विश्वासार्हता, आदर, निष्पक्षता, अभिमान आणि साहचर्य यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक उत्तम कार्यस्थळ निर्माण केले आहे. एंजल वन ही सलग सहाव्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क-सर्टिफाईड संस्था ठरली आहे. द इकॉनॉमिक टाइम्सने २०२२ मध्ये फिनटेक कंपनीला इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्कमध्ये सूचीबद्ध केले. कंपनीला इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस इन फिनटेक २०२२ यादीमध्ये देखील स्थान मिळाले आणि चौथ्यांदा बीएफएसआय २०२२ मध्ये इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस™ म्हणून मान्यता मिळाली.

एंजल वनचे कुठूनही कायमस्वरूपी काम करण्याचे धोरण आणि स्थिर कामकाजाचे तास धोरण कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम काम करण्याचे स्वातंत्र्य देते. कंपनी फेल्युअर क्लबसह इंट्राप्रीन्युरियल आणि नवोन्मेष्कारी संस्कृतीला प्रोत्साहन देते, जेथे एंजलाइट्स एकत्र येतात आणि त्यांच्या अपयशाच्या कथा शेअर करतात. फिनटेक कंपनीकडे डिझाइन लॅबसारखे उपक्रम आहेत, जेथे कर्मचारी तज्ञांच्‍या पॅनेलसमोर त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडतात.

एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “कर्मचाऱ्यांना त्यांचे विचार मुक्तपणे मांडता येतील आणि ते करत असलेल्या कामामध्ये नाविन्यता आणू शकतील असे कार्यस्थळ देणे आवश्यक आहे. आमची स्थिर कामकाज धोरणे खात्री घेतात की, कर्मचारी त्यांना उत्पादनक्षम वाटेल तेव्हा काम करू शकतात. हे कर्मचारी व कंपनी या दोघांसाठी लाभदायी आहे. आम्ही सतत कर्मचाऱ्यांच्या गरजांचे निराकरण करण्याच्या आणि त्याअनुषंगाने कामकाजाच्या प्रक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रक्रियेत आहोत.”

सर्वोत्तम पद्धतींबाबत माहितीची देवाणघेवाण करण्याच्या आणि स्वतंत्र फिनटेक संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने लक्षवेधक समन्वयस्क समूह तयार करण्यासाठी अव्वल उत्पादन कंपन्यांकडून दर्जात्मक टॅलेण्टची नियुक्ती केली जाते.

एकूण स्टार्टअप संस्कृतीला पाठिंबा देत कंपनीचे उच्च मापनीय व स्थिर सोल्यूशन्सची निर्मिती करण्याकरिता खुले व सहयोगात्मक कामकाजाचे वातावरण आहे. एंजल वनची प्रबळ रिवॉर्ड व मान्यता प्रणाली आहे, जी गरज असलेल्या ठिकाणी क्रेडिटची खात्री देते. तसेच मातृत्व, पितृत्व व दत्तक रजा सर्वसमावेशक वातावरणाची निर्मिती करतात आणि कामाच्या ठिकाणी वैविधतेला चालना देतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments