HomeBreakingमूर्तिजापूरात संतप्त शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड...

मूर्तिजापूरात संतप्त शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड…

मूर्तिजापूरात तालुक्यातील पावसामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमिनीचे पिक नष्ट झाले तरी मात्र पीक विमा मदत व महात्मा ज्योतीबा फुले प्रोत्साहन योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पिका विमा कार्यालयात जाऊन तोडफोड केली. यावेळी अप्पू तिडके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील असलेल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.

शेतकर्यांना तात्काळ देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्ह्यातील ४१ ठिकाणी आज रास्ता रोको करण्यात आलाय..दरम्यान, अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी आणि पिकविमा अग्रीम २५ टक्के तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे ही सुद्धा प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

मूर्तिजापूरात संतप्त शिवसैनिकांनी रास्ता रोको नंतर थेट पीकविमा कार्यालय गाठत कार्यालयाची तोडफोड केलीय..शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित पैसे जमा न झाल्यास आणखी उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments