Friday, March 29, 2024
Homeराज्यएस.आर के इंडो किड्स च्या वतीने आगळा वेगळा उपक्रम...विद्यार्थ्याना बसवले बैलबडीत...

एस.आर के इंडो किड्स च्या वतीने आगळा वेगळा उपक्रम…विद्यार्थ्याना बसवले बैलबडीत…

Share

जुन्या गोष्टीची विद्यार्थांना माहिती राहावी करिता राभवला उपक्रम.
विद्यार्थ्यांनी साकारली शेतकऱ्यांची वेशभूषा.
दिवसेंन दिवस बंडी बैलाचे प्रमाण होत आहे कमी.

नरखेड (ता.,13)

एस.आर. के इंडो किड्स जलालखेडा या शाळेच्या वतीने नर्सरी ते केजी 2 च्या विद्यार्थ्यांसाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना बैलबंडित बसून त्यांना फिरवण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात व मार्केट मध्ये बैलबंडित बसूवून फिरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी शेतकऱ्यांची वेशभूषा साकारली होती. दिवसेन दिवस बैलबंडीचे प्रमाण कमी होत आहे. शहरान मध्ये तर बंडीबैल पाहायला मिळत नाही. परंतु ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणत बैलबंडी पाहायला मिळत होते परंतु ते सुध्दा प्रमाण कमी होत चालले आहे.

विद्यार्थ्यांना बंडीबैलाचे काय महत्व आहे. ते काय काम करतात त्यांच्यापासून शेतकऱ्यांना काय फायदा होतो. शेतीची कोणती कामे ते करतात या बाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. जवळपास 200 विद्यार्थी बैलबंडीत बसले व त्यांनी आनंद घेतला. विद्यार्थ्यांना माहिती मिळावी त्यांनी बैलबंडीचा आनंद घ्यावा या दृष्टीने शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी हा आगळा वेगळा उपक्रम घेतला.

यावेळी गजानन नाडेकर व वाडकर या शेतकऱ्यांनी आपली बैलबंडी शाळेत बैलांना पारंपरिक वेशभूषेत आणले होते. यावेळी प्राचार्य शुभांगी अर्डक, ज्योती वंजारी, बबिता दामोधर, उज्वला राऊत, स्वाती नागमोते, प्रियंका नारींगे, शीतल हिवरकर, ज्योत्स्ना सोंनकुसले व इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: