मुंबई – गणेश तळेकर
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये बनलेला ‘अन्य’ हा महत्त्वपूर्ण विषयावरील चित्रपट १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘अन्य’च्या उत्कंठावर्धक ट्रेलरला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद पाहता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. मराठी व हिंदीतील आघाडीच्या कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाचं कथानक समाजातील कटू वास्तवावर आधारित आहे. समाजातील वास्तवावर मनोरंजक पद्धतीनं भाष्य करताना महत्त्वाचे मुद्दे या चित्रपटात मांडले आहेत. ‘अन्य’च्या शोधाचा हा प्रवास रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आहे.
निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं ‘अन्य’ची निर्मिती केली आहे. दक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रसिद्ध असणाऱ्या सिम्मी जोसेफ यांनी ‘अन्य’चं दिग्दर्शन केलं आहे. एक सशक्त कथानकावर आधारलेला तितकाच ताकदवान सिनेमा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेरगिरी, सत्य परिस्थिती, सेक्स ट्रॅफिकींग, बालमजूरी, अनाथांची व्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांना स्पर्श करणारा ‘अन्य’ मानव तस्करीवर प्रकाशझोत टाकणारा आहे.
यातील प्रत्येक कॅरेक्टरला न्याय देण्यासाठी त्याच तोलामोलाच्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. आजवर बंगालीसह हिंदीतही झळकलेली अभिनेत्री रायमा सेना या चित्रपटाच्या निमित्तानं मराठीतही दिसणार आहे. तिच्या जोडीला अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव हे कलाकारही ‘अन्य’मध्ये आहेत. त्यामुळं या चित्रपटात प्रेक्षकांना जणू अभिनयाची जुगलबंदीच पहायला मिळणार आहे.
यातील प्रत्येक कलाकारांनं आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी जीव ओतला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीतही या चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कॅमेरावर्क, कॅास्च्युम, कला दिग्दर्शन आणि सादरीकरणाच्या बाबतीतही ‘अन्य’ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल. अखेरपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य आहे.
जागतिक पातळीवरील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटानं आपला ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. स्वीडनमधील अॅलव्हिसबीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अन्य’ला बेस्ट फिल्म, लंडनमधील फॅलकॅान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (मे एडिशन २०२१) मध्ये बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा खूप गाजावाजा झाला.
दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखन सिम्मी यांनी, तर संवादलेखन महेंद्र पाटील यांनी केलं आहे. डिओपी सज्जन कालाथील यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. गीतलेखन विभागात हिंदी गीतलेखन डॅा. सागर आणि सजीव सारथी यांनी केलं असून, मराठी गीतलेखन प्रशांत जामदार यांनी केलं आहे.
या गीतांना संगीतकार विपीन पटवा, राम नाथ, रिषी एस. आणि कृष्णा राज यांनी स्वरसाज चढवला आहे. रोहित कुलकर्णी यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. थनुज यानी संकलन, साभा मयूरी यांनी कोरिओग्राफी आणि निलम शेटये यांनी कॅास्च्युम डिझाईन केलं आहे. नंदू आचरेकर, रॅाबिन आणि राजू या चित्रपटाचे असोसिएट दिग्दर्शक आहेत, तर शेखर उज्जयीनवाल प्रोडक्शन डिझाईनर आहेत.
इनिशिएटीव्ह फिल्म्स कॅपिटलवुडसच्या सहयोगानं, कथा – दिग्दर्शन – सिम्मी, निर्माते – शेलना के. आणि सिम्मी, सहनिर्माते – सानिल वायप्पण, साजी मुलाकल, सुबोध भारद्वाज, कार्यकारी निर्माते – ससी कुमार, ऑलबीन जोसेफ, साफवान कोलाईल, सिनेमॅटोग्राफी – सज्जन कालाथील, संकलन – थनुज, प्रोडक्शन डिझाईनर – शेखर उज्जयीनवाल, चीफ असोसिएट दिग्दर्शक – रॅाबिन, राजू अभ्राहम, संवादलेखन – महेंद्र पाटील,
संगीतकार – विपीन पटवा, रिषी एस., कृष्णा राज, राम नाथ, गीते – प्रशांत जामदार, डॅा. सागर, सजीव सारथी, क्रिएटीव्ह डायरेक्टर – नंदू आचरेकर ,पार्श्वसंगीत – रोहित कुलकर्णी, साऊंड डिझाईन – कार्तिक शर्मा, साऊंड मिक्सिंग – सुनील कुमार अगरवाल, डीआय कलर – वेणूगोपाल राव, कोरिओग्राफी – साभा भारी, कॅास्च्युम डिझाईन – निलम शेटये, मेकअप – दिव्या वर्मा