Homeराज्यजुने मच्छी व मटण मार्केट पाडून अद्ययावत नवे मच्छी मार्केट बांधण्यासाठी निधी...

जुने मच्छी व मटण मार्केट पाडून अद्ययावत नवे मच्छी मार्केट बांधण्यासाठी निधी मंजूर करा – मा. आम.नितीन शिंदे व नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी…

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील खणभागामध्ये असणाऱ्या मटण व मच्छी मार्केटची इमारत सुमारे 50 वर्ष जुनी आहे.संपूर्ण सांगली शहरातील लोक मासे व मटण खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये दररोज येत असतात. ही इमारत जुनी झाली आहे. खराब झाली आहे.जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे.टाकाऊ मांस व मच्छीची विल्हेवाट लावण्यासाठी अद्ययावत यंत्रणा नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.भटक्या कुत्र्यांचा वावर वाढतो आहे.

नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी महापालिकेच्या महासभेत व प्रशासनाकडे गेली चार वर्षे मच्छी मार्केटच्या नव्या इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने नवीन फिश मार्केट बांधण्याकरता निधी मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवला आहे.

सांगली महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने त्वरित मान्यता द्यावी आणि केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे प्रत्यक्ष निवेदन देऊन केली आहे.

या निवेदनावर आदेश देताना सांगली महानगरपालिकेने पाठवलेला प्रस्ताव मान्य करून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे आता लवकरच नविन मच्छी मार्केटच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होईल असा विश्वास माजी आमदार नितीन शिंदे व नगरसेवीका ॲड.स्वाती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.यावेळी गौतम पवार, आदित्य पटवर्धन,गजानन मोरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments